शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 11:17 IST

महिनाभरापासून भाजपाचा नेता तरुणीचा पाठलाग करत होता. तसेच आपल्याशी मैत्री कर असं सांगत तिला त्रास देत होता.

कानपूर - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. तरुणीचा पाठलाग करणं एका भाजपा नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. महिनाभरापासून भाजपाचा नेता तरुणीचा पाठलाग करत होता. तसेच आपल्याशी मैत्री कर असं सांगत तिला त्रास देत होता. मात्र जेव्हा तरुणीना हा संपूर्ण प्रकार घरी सांगितला तेव्हा तिच्या नातेवाईकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष पांडेय असं या भाजपाच्या नेत्याचं नाव असून तो कल्याणपूर भाजपा सेक्टरचा अध्यक्ष असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या एक महिन्यापासून मनीष तरुणीचा पाठलाग करत आहे. तरुणीला त्रास देत होता. शेवटी तरुणीने याबाबत घरच्यांना माहिती दिली. कुटुंबीयांनी मनीषला बोलावले आणि चपलेने त्याची धुलाई केली आहे. त्याला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

पोलीस करताहेत अधिक तपास

मनीषची धुलाई केल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाजपाच्या या नेत्याला ताब्यात घेतलं आहे. "तरुणीला भेटण्यासाठी गेलो होतो. गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी बोलणं सुरू होतं. मात्र अचानक हे सगळं झालं आहे. कोणीतरी मुद्दाम या लोकांना भडकवलं आहे" अशी माहिती मनीषने पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेत कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या पटनमिट्टामध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका रुग्णवाहिकेत चालकानेच 19 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बलात्कारानंतर आरोपीने तरुणीला कोविड सेंटरमध्ये सोडले आणि तो पसार झाला.

शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ

राजस्थानाच्या सीकरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. शुद्धीकरणासाठी एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र केल्याचा भयंकर प्रकार समोर आला. या दोघांना जवळपास 400 लोकांसमोर गावात आंघोळ घालण्यात आली. सीकरमधील एका गावात ही लाजिरवाणी घटना घडली. खाप पंचायतीच्या आदेशानंतर प्रेमी युगुलासोबत असं वर्तन करण्यात आलं. गावातील एका तरुण-तरुणीच्या प्रेमसंबंधांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पंचांनी या दोघांचं शुद्धीकरण करण्याचा आदेश दिला. तसेच दंडही ठोठावला. शुद्धीकरण करताना या दोघांना निर्वस्त्र करून जवळपास 300 ते 400 गावकऱ्यांच्या उपस्थितीत आंघोळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी

भारीच! मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना'मुळे बदललं तरुणाचं नशीब, महिन्याला लाखोंची कमाई

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता", काँग्रेसचं टीकास्त्र

CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य

CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा