covid 19 patient raped by ambulance driver enroute to hospital in kerala | माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

पटनमिट्टा - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 41,13,812 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 70,626 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेत कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

केरळच्या पटनमिट्टामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णवाहिकेत चालकानेच 19 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बलात्कारानंतर आरोपीने तरुणीला कोविड सेंटरमध्ये सोडले आणि तो पसार झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पीडित तरुणीने कोविड सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांना आपल्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाला अटक केल्याची मााहिती मिळत आहे. तरुणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एक रुग्णवाहिका बोलावली आणि तिला कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. तरुणीसह रुग्णवाहिकेमध्ये आणखी एक रुग्ण होता. त्याला चालकाने रुग्णवाहिकेतून उतरवलं.

चालकाने रुग्णवाहिका एका अज्ञात स्थळी नेली आणि रुग्णवाहिकेत  तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. या भयंकर घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 90,633 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...

CoronaVirus News : ऑनलाईन क्लास दरम्यान प्राध्यापिकेची तब्येत बिघडली, कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर झाला मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला

बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: covid 19 patient raped by ambulance driver enroute to hospital in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.