भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:49 IST2026-05-05T05:48:32+5:302026-05-05T05:49:26+5:30

बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज प. बंगाल, आसाम व केरळबाबत प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. ॲक्सिस माय इंडियाचा टीव्हीकेबाबतचा अंदाज अचूक ठरला. त्यानुसार अभिनेता विजय यांचा पक्ष सर्वात मोठा ठरला.

BJP in power in 22 states with the help of allies; Nabin opens account | भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले

भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले

चंद्रशेखर बर्वे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनविल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून आज आपले विजयाचे खाते उघडले. नबीन यांच्या नेतृत्वात पाच राज्यात निवडणूक लढली गेली. यात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला तर पुद्दुचेरीमध्ये रालोआला यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर, पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”

बहुतांश ‘एक्झिट पोल’ ठरले निकालांच्या जवळपास जाणारे

बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज प. बंगाल, आसाम व केरळबाबत प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. ॲक्सिस माय इंडियाचा टीव्हीकेबाबतचा अंदाज अचूक ठरला. त्यानुसार अभिनेता विजय यांचा पक्ष सर्वात मोठा ठरला.

बहुतांश एक्झिट पोलने प. बंगाल, आसाममध्ये भाजप, तर केरळमध्ये यूडीएफच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पीपल्स पल्सने बंगालमध्ये तृणमूल १७७ ते १८७, तर भाजप ९५ ते ११० जागा मिळवेल, असे म्हटले हेाते. जनमत पोल्सने तृणमूलला १९५ ते २०५ तर भाजपला ८० ते ९० जागा सांगितल्या होत्या.  ‘टुडेज चाणक्य’ने बंगालमध्ये भाजपला १९२ आणि तृणमूलला १०० जागांचा अंदाज मांडला होता.

१. जून - २०१४

  • भौगोलिक क्षेत्रफळ:

    • भाजप: ३४%

    • इतर पक्ष: ६०%

  • लोकसंख्या:

    • भाजप: २५%

    • इतर पक्ष: ७०%

२. जानेवारी - २०१८

  • भौगोलिक क्षेत्रफळ:

    • भाजप: ७५%

    • इतर पक्ष: २५%

  • लोकसंख्या:

    • भाजप: ६९%

    • इतर पक्ष: ३१%

३. मे - २०२६ (वर्तमान स्थिती)

  • भौगोलिक क्षेत्रफळ:

    • भाजप: ७२%

    • इतर पक्ष: २२%

  • लोकसंख्या:

    • भाजप: ७८%

    • इतर पक्ष: २२%

Web Title : भाजपा गठबंधन की 22 राज्यों में सरकार; नबीन ने खोला खाता

Web Summary : भाजपा और सहयोगी दलों ने पश्चिम बंगाल जीत के साथ 22 राज्यों में सरकार बनाई। नितिन नबीन के नेतृत्व में यह सफलता मिली। असम जैसे राज्यों में चुनाव परिणाम एग्जिट पोल के करीब रहे। 2014 से भाजपा का भौगोलिक और जनसंख्या नियंत्रण काफी बढ़ा है।

Web Title : BJP's Alliance Powers 22 States; Nabin Opens Victory Account

Web Summary : BJP, with allies, governs 22 states after West Bengal victory led by Nitin Nabin. Election results closely mirrored exit poll predictions in states like Assam. BJP's geographical and population control has significantly increased since 2014.