नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 08:54 IST2026-05-05T08:48:56+5:302026-05-05T08:54:16+5:30

Pune Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आता या मुलीचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला असून, त्यामधून धक्कादायक  माहिती उघड झाली आहे. 

Pune Nasrapur Case: Shocking information came to light from the postmortem report of 'that' girl from Nasrapur, a murder... | नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…

नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेबाबत राज्यभरातून  संताप व्यक्त करण्यात येत आहे.  यादरम्यान, आता या मुलीचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला असून, त्यामधून धक्कादायक  माहिती उघड झाली आहे. 

आरोपी भिमराव कांबळे याने या  मुलीला बहाणा करून नेल्यानंतर तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. तसेच या नराधमाने अत्याचार करताना या मुलीचा आवाज बाहेर  जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच या मुलीच्या छातीवर वळ उमटलेले दिसून आले. तसेच शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. त्याबरोबरच आरोपीने  हत्या करण्याआधी या मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचेही उघडकीस आले आहे.  

दरम्यान, ही मुलगी उन्हाळ्याच्या सुटीत आजीकडे आली असताना ही भयंकर घटना  घडली. शुक्रवारी नराधमाने तिला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्याकडे नेले. ४ वाजेपर्यंत मुलगी घरी परत न आल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला. चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा दाखवली. त्याने शेणाच्या ढिगाऱ्याखाली  या मुलीचा मृतदेह पुरून  ठेवला होता.

आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का ?
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी दरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. रासायनिक विश्लेषण तपासणी, तसेच लैंगिक सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केले आहेत का, तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. बालिकेला घेऊन जाताना आरोपीला साक्षीदारांनी पाहिले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. आरोपीने बालिकेचा खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का ? अशा मुद्द्यांवर पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे
या प्रकरणातील आरोपी असलेला भीमराव प्रभाकर कांबळे (६५) हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे येथील रहिवासी आहे. साळवडे गावाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाबाहेर काढले होते. तो नसरापूर बाजारपेठेच्या ठिकाणी मोलमजुरीसाठी येत असे. आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत. १९९८ आणि २०१५ साली बलात्काराचे गुन्हे दाखल असून आरोपीने ४ वर्षे कारावास भोगला आहे. सध्या कुणाच्या बांधकामावर, तर कोणाच्या शेतात मोलमजुरी करीत असे.

Web Title : नसरापुर: पोस्टमार्टम में बच्ची की भयावह हत्या का खुलासा

Web Summary : नसरापुर में तीन साल की बच्ची की यौन उत्पीड़न के बाद बेरहमी से हत्या कर दी गई। पोस्टमार्टम से पता चला कि उसका मुंह दबाया गया और पीटा गया। आरोपी का बलात्कार का इतिहास है। पुलिस आगे जांच कर रही है।

Web Title : Nasrapur: Gruesome Murder of Toddler Reveals Horrifying Details in Postmortem

Web Summary : A three-year-old girl was brutally murdered in Nasrapur after being sexually assaulted. The postmortem revealed she was gagged and beaten. The accused has a history of rape. Police are investigating further.