पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 05:43 IST2026-05-10T05:40:10+5:302026-05-10T05:43:18+5:30

सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, स्वातंत्र्यानंतर प्रथमच ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड भाजप सरकारच्या स्थापनेचे ठरले साक्षीदार

BJP government formed in West Bengal, 20 NDA Chief Ministers including Prime Minister present | पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी भाजपच्या राज्यातील पहिल्या सरकारचा शपथविधी पार पडला. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह इतर पाच मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड भाजप सरकारच्या स्थापनेचे साक्षीदार ठरले.

या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे केंद्रीय नेते, तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित (एनडीए) राज्यांचे मुख्यमंत्री भव्य व्यासपीठावर उपस्थित होते. 

'जय श्रीराम'च्या घोषणा, ढोल-ताशे आणि जागोजाग फडकत असलेले भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात सुवेंदू अधिकारी यांना राज्यपाल आर. एन. रवी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच जनतेने दिलेल्या जनादेशापोटी आभार व्यक्त करताना जनतेसमोर हात जोडून नतमस्तक झाले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा आणि टाळ्यांनी मोदी यांचे स्वागत केले.

सामाजिक संतुलनानुसार पाच मंत्र्यांचाही शपथविधी

भवानीपूर व नंदीग्राम या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवलेले सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासोबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, क्षुदिराम टुडू आणि निशीथ प्रामाणिक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उर्वरित मंत्र्यांना सोमवारी राजभवनात शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title : पश्चिम बंगाल में भाजपा सरकार, एनडीए के मुख्यमंत्री उपस्थित।

Web Summary : सुवेंदु अधिकारी ने पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली। दिलीप घोष सहित पांच अन्य ने मंत्री पद की शपथ ली। पीएम मोदी और एनडीए के मुख्यमंत्रियों की उपस्थिति में ब्रिगेड परेड ग्राउंड, कोलकाता में समारोह हुआ।

Web Title : BJP forms government in West Bengal; NDA CMs present.

Web Summary : Suvendu Adhikari sworn in as West Bengal CM. Five others, including Dilip Ghosh, took oath as ministers at a ceremony witnessed by PM Modi and NDA Chief Ministers at Brigade Parade Ground, Kolkata.