शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 7:32 PM

कुशीनगरच्या एका तरुणाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपाचे उमेदवार आहेत.

लखनऊ : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जावर शैक्षणिक योग्यतेवरून स्मृती ईरानींनंतर आता आणखी एक भाजपाचा उमेदवार गोत्यात आला आहे. गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसकडून लढताना त्यांनी पदवी आणि 2019 मध्ये 12 वी असे शिक्षण नमूद केल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जावर टांगती तलवार आहे. 

कुशीनगरच्या एका तरुणाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपाचे उमेदवार आहेत. 2014 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून उमेदवार होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जावर शिक्षण पदवी दाखविली होती. मात्र, 2019 मध्ये ते भाजपाच्या तिकीटावर लढत असून गोरखपूरमध्ये भरलेल्या उमेदवारी अर्जावर त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. आधी पदवी आणि नंतर 12वीचे शिक्षण कोणत्या विद्यापीठात घेता येते, असा प्रश्नही या तरुणाने उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणीही य़ा युवकाने केली आहे. 

या प्रकाराची चौकशी केली जात असून जर रवी किशन यामध्ये दोषी आढळले तर त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. 2014 च्या अर्जामध्ये त्यांनी मुंबईतील रिझवी कॉलेजमधून 1992-93 मध्ये बीक़ॉम उत्तीर्ण केल्याचे म्हटले आहे. तर 2019 च्या अर्जामध्ये 1990 मध्ये 12 वी पास झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही अर्जांवर शैक्षणिक संस्था मात्र सारखीच आहे. 

स्मृती ईरानींविरोधातही तक्रारयाआधी अमेठीच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती इरानी यांच्याविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. 2004 मध्ये त्यांनी दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविताना 1996 मध्ये कला शाखेची पदवी घेतल्याचे म्हटले होते. तर 2019 मध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतले नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Ravi Kishanरवी किशनgorakhpur-pcगोरखपुरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपा