अबब! भाजपकडे किती संपत्ती? आकडा पाहून डोळे विस्फारतील; काँग्रेस जवळपासही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:05 AM2022-01-29T08:05:28+5:302022-01-29T08:08:16+5:30

सत्ताधारी भाजपकडे सर्वाधिक संपत्ती; बसप दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

BJP assets account for 69 percent of all national parties combined says ADR report | अबब! भाजपकडे किती संपत्ती? आकडा पाहून डोळे विस्फारतील; काँग्रेस जवळपासही नाही

अबब! भाजपकडे किती संपत्ती? आकडा पाहून डोळे विस्फारतील; काँग्रेस जवळपासही नाही

Next

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ८४७.७८ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये ही सर्वाधिक आहे. भाजपाखालाेखाल बहुजन समाजवादी पार्टीने ६९८.३३ आणि काॅंग्रेसने ५८८.१६ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. 

असाेसिएशन फाॅर डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणावादी संस्थेने एका अहवालातून ही माहिती दिली. संस्थेने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय, तसेच प्रादेशिक पक्षांची संपत्ती व देणींच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. त्यात ७ राष्ट्रीय आणि ४४ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. या पक्षांकडून अनुक्रमे ६ हजार ९८८ काेटी आणि २ हजार १२९ काेटी रुपयांची संपत्ती हाेती. 

एफडीआर श्रेणीतील जमा
भाजपकडे ३ हजार २५३ काेटी, बसपाकडे ६१७ काेटी व काॅंग्रेसकडे २४० काेटी रुपये एफडीआर श्रेणीमध्ये जमा आहेत. सपाकडे ४३४, टीआरएसकडे २५६ आणि एआयएडीएमकेकडे २४६, तर डीएमकेकडे १६२ काेटी रुपये या श्रेणीत जमा आहेत.

Web Title: BJP assets account for 69 percent of all national parties combined says ADR report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.