शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

यूपीत मित्र पक्षाची एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची धमकी, भाजपाच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:52 PM

लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदी वाढत चालली आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदी वाढत चालली आहे. एनडीएतल्या मित्र पक्षांनीही भाजपाच्या नाकीनऊ आणले आहेत. उत्तर प्रदेशमधला भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेवनं भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी भाजपाबरोबर असलेली युती तोडण्याचा इशारा दिला आहे.राजभर म्हणाले, भाजपानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही त्यांच्याबरोबरची युती तोडू. सामाजिक न्याय समितीच्या शिफारशी 24 फेब्रुवारीपर्यंत लागू न केल्यास आम्ही भाजपापासून वेगळे होऊ. त्यानंतर आम्ही लोकसभेच्या 80 जागांवर उमेदवार उभे करू. आम्ही गरज पडल्यास भाजपाविरोधी असलेल्या सपा-बसपाबरोबरही जाऊ शकतो. त्यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहे. 24 फेब्रुवारीनंतर भाजपाबरोबर कोणताही समझोता करणार नाही. तत्पूर्वी एनपीपीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरोड संगमा यांनी भाजपापासून फारकत घेण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी देशात भाजपा दंगली घडवेल, असं विधानही ओम प्रकाश राजभोर यांनी केलं होतं. बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर म्हणाले होते की, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपा देशात दंगली घडवेल, देशात दंगली होऊ शकतात, त्यामुळे जनतेनं हिंदू-मुस्लिमांच्या नावानं भांडू नये, दंगलीत कोणत्याही नेत्याचा नव्हे, तर सामान्य व्यक्तीचाच जीव जातो, असंही त्यांनी अधोरेखित केलं होतं. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला होता. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradeshउत्तर प्रदेश