शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

Bihar Political Crisis: बिहारमधील सरकार कोसळलं; मुख्यमंत्री नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:06 PM

बिहारमध्ये एकूण २४३ सदस्य संख्या आहे. याठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे

पटना - महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. जेडीयू आमदार, खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी(Nitish Kumar) राज्यपालांची भेट घेतली. नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. आता राज्यात नवीन राजकीय समीकरणं उदयास आली आहेत. 

जेडीयू बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपानं नेहमी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. भाजपानं जेडीयू पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाआघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात आरजेडीचे तेजस्वी यादव हे राज्यपालांच्या भेटीला पोहचणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्याच पार पडण्याची शक्यता आहे. जेडीयूच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी भाजपासोबत आघाडी तोडत असल्याची घोषणा केली. 

बिहारमध्ये सध्याची परिस्थितीबिहारमध्ये एकूण २४३ सदस्य संख्या आहे. याठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे. सध्याचं चित्र बिहारमध्ये सर्वात मोठी पार्टी आरजेडी आहे. त्यांच्याकडे ७९ आमदार आहेत. तर भाजपाकडे ७७, जेडीयू ४५, काँग्रेसकडे १९, कम्युनिस्ट पार्टीकडे १२ आणि एआयएमआयएम १, हिंदुस्तानी आवाम मोर्चा ४ यासह इतर अपक्ष आमदार आहेत. 

जेडीयूकडे ४५ आमदार आहेत तर सरकार बनवण्यासाठी त्यांना ७७ आमदारांची गरज आहे. मागील काही दिवसांत जेडीयू आणि आरजेडी यांच्यात जवळीक वाढली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाआघाडीकडे १२४ संख्याबळ आहे जे बहुमतापेक्षा जास्त आहे. या आघाडीत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीही सहभागी होऊ शकते. असे झाल्यास महाआघाडीकडे १५५ पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असेल. 

नवं सरकार कसं असेल?नितीश कुमारांनी भाजपाशी युती तोडल्यानंतर आता आरजेडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहेत. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदासह गृह खाते स्वत:कडे ठेवतील. त्याचसोबत नव्या विधानसभेचे अध्यक्ष आरजेडीचे असतील. गृहखाते जेडीयू नेहमी त्यांच्याकडे ठेवते परंतु नव्या सरकारमध्ये ते आरजेडीकडे जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादव