शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:07 IST

तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय...

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. यातच, आज राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनीही (रविवार, २६ ऑक्टोबर) मोठी घोषणा केली आहे. महाआघाडीची सत्ता आल्यास राज्यातील पंचायत प्रतिनिधींना पेन्शन (Pension) आणि ५० लाख रुपयांचे विमा कवच (Insurance Cover) दिले जाईल, अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे. ते पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नितीश कुमार सरकारवर हल्ला चढवताना तेजस्वी म्हणाले, "बिहार बदलासाठी तयार आहे. गेल्या २० वर्षांपासून राज्यात 'खटारा' सरकार आहे. आम्ही जेथे जात आहोत, तेथे सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी येत आहेत. जनता भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारीने त्रस्त असून, हे सरकार बदलण्यास उत्सुक आहे."

मानधन दुप्पट करणार, लघुउद्योजकांना ५ लाखांची मदत - तेजस्वी पुढे म्हणाले, "आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल." याशिवाय, "सोनार, न्हावी, लोहार आणि सुतार यांसारख्या पारंपरिक व्यवसायांशी संबंधित लोकांना स्वयंरोजगारासाठी एकरकमी ५ लाख रुपये दिले जातील," असेही ते म्हणाले.

भाजप-नितीश निशाण्यावर - यावेळी तेजस्वी यादव यांनी, भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "बिहारमध्ये जाणूनबुजून कारखाने (Factories) लागू दिले नाहीत. आपल्या १७ महिन्यांच्या काळात चांगले काम झाले  होते, 'चाचाजी पलटले' (नितीश कुमार) नसते तर आणखी काम झाले असते. तसेच, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी, "बिहारच्या जनतेने विद्यमान सरकारला २० वर्षे दिली. आम्ही केवळ २० महिने मागत आहोत," असे म्हणत त्यांनी जनतेला महाआघाडीला संधी देण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस