शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:08 IST

Akhilesh Yadav vs BJP, Bihar Assembly Election Result 2025 Live Updates : बिहार निवडणुकीत काँग्रेस-तेजस्वी यादव यांच्यात महागठबंधनचा सुपडा साफ झाला

Akhilesh Yadav vs BJP, Bihar Assembly Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले आणि ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आणि भाजपा-जेडीयू युतीने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. २४३ जागांवर हाती आलेल्या कलांनुसार भाजपा-जेडीयू युतीला १९०पेक्षाही जास्त जागांवर आघाडी मिळाली. तर राजदचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसून आले.

बिहार मधील निवडणुकीच्या कलांमध्ये एनडीए १९० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे, तर महागठबंधन केवळ ४९ जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडवरून, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होताना दिसत आहे. याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक ट्विट करत भाजपा-जेडीयू युतीला टोला लगावला. "बिहारमधील निवडणुकीच्या ट्रेंडवर भाष्य करताना अखिलेश यादव यांनी टोला लगावला. "बिहारमध्ये SIR ने खेळलेला खेळ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश किंवा इतरत्र शक्य होणार नाही; कारण निवडणुकीतील हा कट उघड झाला आहे. आम्ही त्यांना हा खेळ आता खेळू देणार नाही. सीसीटीव्हीप्रमाणे, आमचे 'पीपीटीव्ही' किंवा 'पीडीए प्रहारी' सतर्क राहतील आणि भाजपचे कट उधळून लावतील. भाजप हा पक्ष नाही, तर एक फसवणूक करणारा गट आहे," असे मत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले.

बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल?

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील दुपारी १ वाजताच्या आकडेवारीनुसार, २४३ जागांपैकी भाजपाने ९१ जागांवर तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने ८१ जागांवर आघाडी घेतली. चिराग पासवान यांच्या पक्षाने २१ जागांवर आघाडी घेतली. दुसरीकडे काँग्रेस महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाला केवळ २७ जागांवर तर काँग्रेसला ४ जागांवर आघाडी मिळाली. त्यामुळे महागठबंधनचे पानिपत झाल्याचे चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akhilesh Yadav Slams BJP After Bihar Election Results; Alleges Foul Play

Web Summary : After Bihar's election, Akhilesh Yadav accused the BJP of foul play. He alleged a conspiracy, warning against similar tactics in other states. NDA leads with 190 seats.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारElectionनिवडणूक 2024Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेडchirag paswanचिराग पासवानAkhilesh Yadavअखिलेश यादव