शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:01 IST

Bihar Assembly Election Result:बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

एनडीए : गेमचेंजर ठरलेल्या गोष्टी- महिलांचा विश्वास : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील १.३ कोटी महिलांना निवडणुकीच्या आधी दिलेली १० हजारांची थेट आर्थिक मदत मतपेटीत मोठ्या प्रमाणात परावर्तित झाली. -कट्टा अन् जंगलराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘कट्टा, दुन्नाली, रंगदारी’ची आठवण प्रभावी ठरली. राजद आल्यास ‘जंगलराज’ येईल, हा संदेश विशेषतः ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचला.  -गावखेड्यांमध्ये मोफत वीज : गावोगावी १२५ युनिटपर्यंत मोफत वीज योजना एनडीएसाठी हुकमी एक्का ठरला. अनेक कुटुंबांचे वीजबिल शून्यावर आले असल्याने नाराजीला स्थानच उरले नाही.  - पेन्शन वाढ : ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये ४०० वरून ११०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यामुळे ज्येष्ठ मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावरच विश्वास दाखवला.  -गोंधळलेले विरोधक : महाआघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करण्याऐवजी ‘एसआयआर’ मुद्द्यावर प्रचार मोहीम वळवली. निवडणुकीच्या वेळी हा विषय अप्रासंगिक ठरला.  

महाआघाडी : पराभवाची कारणे- यादव राज : राजदने ५२ यादव उमेदवारांना तिकीट दिले. त्यामुळे बिगर-यादव समाजातील मतदारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आणि ‘यादव राज’ अशी महाआघाडीची प्रतिमा निर्माण झाली. -एकजुटीचा अभाव : राजद-काँग्रेस-डाव्या पक्षांची महाआघाडी असतानाही, तेजस्वी यादव यांची ‘राजद केंद्रित’ भूमिका अडचणीची ठरली. यामुळे महाआघाडीतील मित्रपक्षांची एकजूट दिसली नाही. -ब्लू प्रिंटच नव्हती : ‘हर घर सरकारी नोकरी’, ‘महिला सशक्तीकरण’ अशा अनेक घोषणा महाआघाडीने केल्या. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची ठोस ब्लू प्रिंट ते मतदारांना देऊ शकले नाहीत.-मुस्लिम अनुनय : महाआघाडीची मुस्लिम अनुनयाची प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबवण्यात एनडीएला यश आले. त्याचा इतर समाजातील मतदानावर प्रतिकूल परिणाम झाला. -विसंगती : तेजस्वी यांनी वडील लालू प्रसाद यादव यांचा वारसा सांगितला, मात्र पोस्टर्सवर लालू प्रसाद यांचा फोटो छोटा वापरला. यातून तेजस्वी यांची विसंगत प्रतिमा मतदारांसमोर आली.  

English
हिंदी सारांश
Web Title : NDA's victory and Grand Alliance's defeat: Five key reasons explained.

Web Summary : NDA's victory in Bihar stemmed from women's support, fear of 'jungle raj', free electricity, pension hikes, and opposition missteps. The Grand Alliance lost due to Yadav dominance, lack of unity, vague promises, perceived Muslim appeasement, and inconsistent messaging.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Janta Dal Unitedजनता दल युनायटेडRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाcongressकाँग्रेस