शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 20:02 IST

Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएला एक मोठा धक्का बसला आहे. एनडीएतील एक घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या एका महिला उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे एनडीएला मतदानापूर्वीच एक जागा गमवावी लागली आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यादरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या एनडीएला एक मोठा धक्का बसला आहे. एनडीएतील एक घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या एका महिला उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे एनडीएला मतदानापूर्वीच एक जागा गमवावी लागली आहे. आता राज्यातील २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी २४२ मतदारसंघात एनडीएचं आव्हान उरलं आहे.

बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील ४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये एनडीएमधील चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या उमेदवार सीमा सिंह यांचाही समावेश आहे. सीमा सिंह यांच्या उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. सीमा सिंह यांच्या व्यतिरिक्त अल्ताफ अहमद राजू, अपक्ष उमेदवार विशाल आणि बसपाचे उमेदवार आदित्य यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

मढौरा विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण  १२१ जागांवर मतदारन होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ ऑक्टोबर होती. त्यामुळे आता या मतदारसंघात महाआघाडी आणि जनसुराज्य या दोन पक्षांमध्येच लढत उरली आहे. तसेच त्यात महाआघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, एनडीएच्या जागावाटपामध्ये चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या वाट्याला २९ जागा आल्या होत्या. मात्र एका जागेवर उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आता केवळ २८ जागांवर त्यांचे उमेदवार उरले आहेत.   

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: NDA loses a seat before voting due to error.

Web Summary : NDA suffered a setback in Bihar as LJP candidate's nomination was rejected. This reduces their contested seats to 242 out of 243. The error occurred in Madhaura, favoring Mahagathbandhan.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग