शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:17 IST

Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील मोकामा टाल क्षेत्रात प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी आणि गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रियदर्शी यांचे समर्थक दुलारचंद यादव गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील मोकामा टाल क्षेत्रात प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी आणि गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रियदर्शी यांचे समर्थक दुलारचंद यादव गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा  दुलारचंद यादव हे प्रचारामध्ये गुंतले होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोकामा टाल क्षेत्रातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार पियूष प्रियदर्शी यांचा प्रचार सुरू होता. यादरम्यान, दोन गटांमध्ये वाद झाला. तसेच वादाचं पर्यावसान हाणामारी आणि गोळीबारात झाले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यादरम्यान, दुलारचंद यादव यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

दुलारचंद यादव हे एकेकाळी लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. सध्या ते मोकामामधील उमेदवार पियूष प्रियदर्शी यांना पाठिंबा देऊन प्रचारामध्ये गुंतले होते. चार दिवसांपूर्वी दुलारचंद यादव यांनी लल्लू मुखिया यांच्या समर्थनार्थ एक गीतही गायलं होतं. एवढंच नाही तर मोकामा टाल क्षेत्रामध्ये त्यांचा बऱ्यापैकी धाक होता. या प्रकरणी आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Violence: Prashant Kishor's Party Leader Shot Dead

Web Summary : Bihar election campaign turns deadly. A leader supporting Prashant Kishor's Jan Surajya Party was shot dead during a clash in Mokama. The victim, Dularchand Yadav, was campaigning when violence erupted between two groups. Police are investigating the incident.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Crime Newsगुन्हेगारी