शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी

By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 9:31 PM

Income tax raid on Congress headquarters News : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली.

ठळक मुद्देप्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चाललीप्राप्तिकर विभागाने एका कारमधून आठ लाख रुपये जप्त केलेया प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांचीही चौकशी करण्यात आली

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराने जोर धरला आहे. दरम्यान, आज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली आहे. या धाडीदरम्यान, प्राप्तिकर विभागाने एका कारमधून आठ लाख रुपये जप्त केले. तसेच या प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांचीही चौकशी करण्यात आली.प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर नोटिस लावली आहे. दरम्यान शक्ती सिंह गोहिल यांनी जप्त केलेली रक्कम कुणाची आहे, हे मला माहिती नाबी असे सांगितले. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चालली. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने एका व्यक्तीला पकडले आहे. त्याने ही रक्कम पाटणामधील कुणाला तरी देण्यात येणार होता, असे सांगितले. आता प्राप्तिकर विभाहाने काँग्रेसकडे संपूर्ण प्रकरणाचे उत्तर मागितले आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठल्या नेत्याने या व्यक्तीला ही रक्कम दिली होती, अशी विचारणा प्राप्तिकर विभागाने केली आहे.

दरम्यान, या कारवाईवरून शक्तिसिंह गोहिल यांनी प्राप्तिकर विभागावर जोरदार टीका केली आहे. परिसरात बाहेर एका गाडीतून पैसे जप्त करण्यात आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने नोटिस दिली आहे. ही रक्कम कार्यालयाच्या परिसरातून रक्कम जप्त करण्यात आलेली नाही.आम्ही सहकार्य करू. रक्सौलमध्ये भाजपाच्या उमेदवाराकडून २२ किलो सोने आणि २.५ किलो चांदी जप्त करण्यात आली होतो. प्राप्तिकर विभाग तिथे का जात नाही आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.तर सत्ता येण्यापूर्वीच महाआघाडीच्या नेत्यांना लुटमार सुरू केली आहे. प्राप्तिकर विभागाने महाआघाडीच्या नेत्यांच्या घरांवार धाडी टाकाव्यात, तिथे अब्जावधी रुपये मिळतील, असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकIncome Taxइन्कम टॅक्सcongressकाँग्रेस