शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 00:07 IST

Baba Siddique Case: पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपांनी पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी बाबा सिद्दिकी प्रकरणात मोस्ट वॉन्टेड होता.

Baba Siddique Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात सामील असलेला एक मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला असून, पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या स्फोट प्रकरणातही या आरोपीचा सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. पंजाबपोलिसांनी त्याला अटक केली आहे. झिशान अख्तरच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. जालंदर येथे भाजपा नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी स्फोट करण्याचा प्रयत्न असलेल्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे झिशान अख्तरच्या गँगमधील आहेत. यातील झिशान अख्तर हा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सामील आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर झिशान सिद्दीकी फरार झाला होता. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी जे फरार आरोपी आहेत, त्यामध्ये शुभम लोणकर याचाही समावेश आहे.

झिशान अख्तर याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दिकी यांची हत्या

झिशान अख्तर याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली, असे बोलले जात आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघे सूचना देत होते, हे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या झिशान अख्तरच्या मागावर मुंबई पोलीस होते. आता त्याला पंजाबच्या जालंधरमध्ये अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या झिशान अख्तरला पंजाब येथील जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी याबद्दलची खात्री केलेली आहे की, झिशान अख्तर हा तोच आरोपी आहे, जो बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी आरोपी होता. 

दरम्यान, मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेर वाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बहराइच, उत्तर प्रदेश येथील रहिवासी हरीश कुमार, कैथल, हरयाणा येथील गुरमेल बलजित सिंग, बहराइच, उत्तर प्रदेश येथील धर्मराज कश्यप आणि पुण्यातील रहिवासी प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे.

 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीPoliceपोलिसPunjabपंजाब