शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:02 IST

काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने बुधवारी रिअल-टाइम मतदान डेटा आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेला अंतिम डेटा यांच्यातील प्रचंड तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, मतदार या विचित्र घडामोडीमुळे खूप चिंतेत आहेत. काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे.

१०-११ दिवसांचा कालावधी का?‘मतदानाच्या चार टप्प्यांदरम्यान निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या कामाबद्दलच्या विचित्र हालचालींमुळे मतदार चिंतेत आहेत. प्रथम, अंतिम मतदानाची आकडेवारी समोर आणण्यासाठी निवडणूक आयोगाला १०-११ दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर वास्तविक मतदान आणि आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये १.७ कोटी मतांचे अंतर असते. हे खरोखरच अभूतपूर्व आहे, तसेच ईव्हीएम गहाळ झाल्याबद्दल अनुत्तरित प्रश्नदेखील खूप चिंताजनक आहेत,’ खेडा सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये म्हणाले.

प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांची वाढ- पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश याबाबत म्हणाले की, ‘एकंदरीत १.७ कोटी मतांचा हा फरक प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांच्या वाढीइतका आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. - भाजपच्या मोठ्या जागा गमावण्याचा अंदाज असलेल्या राज्यांमध्ये ही तफावत सर्वाधिक आहे.’ काँग्रेसबरोबरच इतर विरोधी पक्षांनीही अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान