शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 07:15 IST

पाच लाख कर्मचारी; दोनपैकी एका केंद्रशासित प्रदेशाचा विचारला पर्याय

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : अनेक दशके उत्तम प्रकारे राहिलेली जम्मू आणि काश्मीर आणि लडाखची नोकरशाही आता त्या सुखासीन वातावरणातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने या नोकरशाहीत मोठे बदल करण्याची योजना आखली असून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांतील नोकरशाहीत हे बदल लवकरच दिसू लागतील.

सरकारचे ४१ विभाग आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ५ लाख कर्मचाऱ्यांना तुम्ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशात काम करू इच्छिता असा पर्याय विचारला गेला आहे. अखिल भारतीय सेवांतील अधिकाऱ्यांनाही दोनपैकी एका केंद्रशासित प्रदेशाचा पर्याय दिला जाईल. जून २०१८ मध्ये छत्तीसगड केडरचे अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये मुख्य सचिव म्हणून पाठवण्यात आले होते. तेव्हा नरेंद्र मोदी प्रशासनात काय शिजते आहे याची किंचितशी कल्पनाही कोणाला आली नाही. माजी संरक्षण सचिव आर. के. माथूर यांची आणि माजी व्यय सचिव जी. सी. मुर्मू यांच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी झालेल्या नियुक्तीबद्दल बरेच लिहून आलेले आहे.माथूर आणि मुर्मू हे चाकोरीच्या बाहेर विचार करणारे आहेत.भरती केंद्रशासित प्रदेश केडर अंतर्गतनवी भरती ही केंद्रशासित प्रदेश केडरअंतर्गत केली जाईल व आता त्यांना नऊपैकी कोणत्याही केंद्रशासित प्रदेशात पाठवले जाऊ शकेल. त्यांची नियुक्ती ही दिल्ली, चंदीगड, पुड्डुचेरी, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली व लक्षद्वीप येथे होऊ शकेल.जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायद्यात जम्मू आणि काश्मीरचे नवे लेफ्टनंट गर्व्हनर गृह मंत्रालयाशी विचारविनिमय करून निर्णय घेतील, असे म्हटले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर जी. सी. मुर्मू हे नव्या नियुक्त्यांसाठी नवे प्रमुख असतील. 

टॅग्स :ladakhलडाखladakh-pcलडाखJammu Kashmirजम्मू-काश्मीर