शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतळी बनवले' 

By ravalnath.patil | Updated: September 25, 2020 11:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बंदला पाठिंबा

नवी दिल्ली : मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली, तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची हाक दिली आहे.

या बंदमध्ये अनेक शेतकरी संघटनांसह काँग्रेस, आरजेडी, समाजवादी पार्टी, अकाली दल, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. 

दुसरीकडे बिहारमध्ये या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांसह आरजेडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी कृषी विधेयकांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी "सरकारने आमच्या 'अन्नदाता'ला 'निधीदाता'च्या माध्यमातून कठपुतळी बनविले आहे. कृषी विधेयक हे शेतकरीविरोधी आहे. सरकारने म्हटले होते की २०२० पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू. मात्र, हे विधेयक त्यांना गरीब बनवेल. कृषी क्षेत्र कॉर्पोरेट झाले आहे." अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बंदला पाठिंबास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्रामध्ये सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयक विधेयके म्हणजे शेती व शेतकरी यांना उद्ध्वस्त करण्याचाच डाव आहे. या कृषी विधेयकांमुळे आगामी काळात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले. तसेच, कोल्हापूरात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलकांनी कृषी विधेयकांची होळी केली.  

आणखी बातम्या..

- गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका    

- रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध    

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारagricultureशेतीFarmerशेतकरी