CoronaVirus News: first batch of covid 19 vaccine sputnik v civil circulation moscow russia | CoronaVirus News : रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध

CoronaVirus News : रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध

ठळक मुद्देरशियाची ही लस भारतालाही मिळण्याची शक्यता आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. आतापर्यंत जगातील ३.२२ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील बर्‍याच देशांमध्ये लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. आता रशियातील कोरोनावरील ही लस लोकांसाठी उपलब्ध झाली आहे.

रशियाने कोरोना व्हायरच्या लसीचे नाव 'स्पुतनिक-व्ही' असे ठेवले आहे. तसेच, 'कोरोना नष्ट करण्यासाठी 'स्पुतनिक-व्ही' लस खूप प्रभावी ठरेल', असे रशियाचे म्हणणे आहे. 'स्पुतनिक-व्ही' ही लस आता रशियाने आपल्या देशातील लोकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, रशियाची राजधानी मॉस्कोमधील लोकांना 'स्पुतनिक-व्ही' लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यात रशियाच्या गामालेया वैज्ञानिक संशोधन संस्थेने 'स्पुतनिक-व्ही' लस लाँच केली होती. ही लस लाँच झाल्यापासून चर्चेत आहे. तसेच, रशिया इतर देशांनाही ही लस पुरवण्याच्या योजनेवर काम करत आहे. रशियाची ही लस भारतालाही मिळण्याची शक्यता आहे.

भारतातील लोकांसाठी रशियाच्या या 'स्पुतनिक-व्ही' लसीसाठी चर्चा सुरू आहेत. लसीचा पुरवठा करण्याची ही प्रक्रिया चाचणी पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस सुरू केली जाऊ शकते. 'स्पुतनिक-व्ही' लस मंजूर होण्यापूर्वी या लसीचे क्लिनिकल ​​ट्रायल भारतातील लोकांवरही करण्यात येणार आहे.

भारतात कोरोनाचे ८६०५२ नवे रुग्ण ११४१ जणांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचारसुरु असलेल्या ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९,७०,११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४७,५६, १६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. 

आणखी बातम्या..

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: first batch of covid 19 vaccine sputnik v civil circulation moscow russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.