शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

बेलोना....

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव

जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव
बेलोना येथे आयोजन : विविध १४ आश्रमशाळांचा सहभाग
बेलोना : विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. स्थानिक मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त ए.डी. आत्राम होते. याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, राजाभाऊ सातपुते, सरपंच कीर्ती पराते, उपसरपंच ललित काळमेघ यांची उपस्थिती होती.
तीन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध १४ आश्रमशाळांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकनृत्य स्पर्धेत वाघदरा येथील आश्रमशाळेने प्रथम, तर बेलोना आश्रमशाळेने द्वितीय पुरस्कार पटकावला. इतर शाळांच्या चमूंना प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)