शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मागासवर्गीयांप्रमाणे सवलती दिव्यांगांनाही मिळायला हव्या, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 5:30 AM

चंदीगडमधील सरकारी कला महाविद्यालयातील गेल्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेतून निर्माण झालेल्या वादातून हे प्रकरण न्यायालयांकडे आले होते.

नवी दिल्ली : दिव्यांग व गतिमंद व्यक्तीही सामाजिकदृष्ट्या मागासच असतात. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना ज्या सवलती व फायदे दिले जातात ते दिव्यांगांनाही दिले जायला हवेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.५० टक्के गतिमंद असलेल्या चंदीगडमधील आर्यन राज या विद्यार्थ्याने केलेल्या अपिलावर न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. नवीन सिन्हा व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.चंदीगडमधील सरकारी कला महाविद्यालयातील गेल्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेतून निर्माण झालेल्या वादातून हे प्रकरण न्यायालयांकडे आले होते. याचिकर्त्या आर्यन राजने फाईन आर्ट पदविका अभ्यासक्रमासाठी दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी अर्ज केला होता. प्रवेश नियमांमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ‘अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ (कल चाचणी) घेण्याची तरतूद होती. या टेस्टमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारास किमान ४० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारास किमान ३५ टक्के गुण मिळाले तरच तो प्रवेशासाठी पात्र ठरेल, असा नियम होता. याविरुद्ध आर्यन राजने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.अपिलात सर्वोच्च न्यायालयानेही या दोन्ही मुद्यांवर उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरविला. दिव्यांग व गतिमंद व्यक्तीही सामाजिकदृष्ट्या मागासच असतात. त्यामुळे प्रवेश अनुसूचित जाती व जमातींच्या उमेदवारांसाठी मगासलेपणाच्या निकषावर प्रवेश नियमांत जर ‘अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’मध्ये किमान ३५ टक्के गुण हा प्रवेशासाठी पात्रता निकष असेल तर तोच निकष दिव्यांग व गतिमंदांनाही लागू केला जायला हवा. यापुढील वर्षांत यानुसार प्रवेश देण्याचा आदेशही दिला गेला.एक वर्ष वाया गेले- या कोर्टबाजीत आर्यनचे एक वर्ष वाया गेले. कारण न्यायालयीन प्रकरणांचे निकाल होईपर्यंत गेल्या वर्षी त्याने ज्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता त्यातील राखीव कोट्याची जागा भरली गेली.- त्यामुळे त्याने आता यंदाच्या प्रवेशाच्या वेळी हवा तर पुन्हा अर्ज करावा व त्याने तसा अर्ज केल्यास त्याला ‘अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट’च्या उत्तीर्णतेसाठी ३५ टक्क्यांचा निकष लागू होईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय