पप्पा, पप्पा... किंचाळत राहिली मुलं; टायरचा भीषण स्फोट होऊन लेकरांसमोरच वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:02 IST2026-03-19T16:00:35+5:302026-03-19T16:02:07+5:30

टायरमध्ये हवा भरत असताना अचानक टायरचा स्फोट झाल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.

azamgarh person lost his life when tyre suddenly burst while he was filling air in it | पप्पा, पप्पा... किंचाळत राहिली मुलं; टायरचा भीषण स्फोट होऊन लेकरांसमोरच वडिलांचा मृत्यू

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. टायरमध्ये हवा भरत असताना अचानक टायरचा स्फोट झाल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासचे लोकही आवाजाने हादरले.

मिळालेल्या माहितीनुसार, टायर दुरुस्तीच्या दुकानात ही भयंकर घटना घडली. एक व्यक्ती टायरमध्ये हवा भरत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही सामान्य सुरू होतं, पण अचानक एका मोठ्या आवाजासह टायर फुटला. या स्फोटाचा वेग इतका प्रचंड होता की, ती व्यक्ती जोरात हवेत उडून थेट रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर घटनास्थळी एकच पळापळ झाली. आसपासच्या लोकांनी धावत जाऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्या व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. या भीषण दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी त्या व्यक्तीची लहान मुलंही तिथेच हजर होती. स्फोट होताच मुलगा आणि मुलगी धावत त्याच्याकडे गेले आणि जोरात 'पप्पा-पप्पा' म्हणून हाका मारू लागले, किंचाळले. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. टायरमध्ये हवा भरताना अनेकदा सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केलं जातं, जे अशा भयानक दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरतं.

Web Title : बच्चों की चीखें: पिता की टायर फटने से बच्चों के सामने मौत

Web Summary : उत्तर प्रदेश के आजमगढ़ जिले में एक दुखद घटना में एक व्यक्ति की जान चली गई। टायर की मरम्मत की दुकान पर हवा भरते समय टायर फट गया, जिससे बच्चों के सामने ही उसकी मौके पर मौत हो गई। सुरक्षा उपायों की अनदेखी को कारण माना जा रहा है।

Web Title : Children's screams: Father dies in tire explosion before their eyes.

Web Summary : A tragic accident in Uttar Pradesh's Azamgarh district claimed a man's life. A tire exploded while he was inflating it at a repair shop, killing him instantly in front of his children. Negligence regarding safety measures is suspected as the cause.