शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मंत्र्यांच्या यज्ञादरम्यान थरार! नारळाचा स्फोट होऊन यज्ञशाळेला भीषण आग; अनेक पंडाल जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:46 IST

Ayodhya pandal fire news: अयोध्येतील यज्ञशाळेत भीषण आग. नारळाच्या स्फोटामुळे पंडालला आग लागल्याची धक्कादायक घटना. भाविकांची पळापळ, अग्निशमन दल घटनास्थळी.

रामललाच्या नगरीत, अयोध्येत एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका भव्य यज्ञशाळेत यज्ञ सुरू असताना अचानक आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील अनेक पंडाल जळून खाक झाले आहेत. यज्ञकुंडात अर्पण केलेल्या एका नारळाचा जोरदार स्फोट झाला आणि त्यातील ठिणग्या बाजूच्या कापडी पंडालवर पडल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यज्ञशाळेत विधी सुरू असताना पूर्णाहुतीच्या वेळी किंवा प्रक्रियेदरम्यान एका नारळाचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यातील आगीचे गोळे थेट छताला आणि बाजूच्या पंडालला जाऊन चिकटले. उन्हाळ्याचे दिवस आणि कोरड्या हवामानामुळे आगीने काही मिनिटांतच संपूर्ण यज्ञशाळेला विळखा घातला. बाजूला असलेले अनेक तात्पुरते पंडाल आणि भक्तांच्या निवासाची सोय असलेले तंबू या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. हा महायज्ञ उत्तर प्रदेशचे मंत्री दयाशंकर सिंह यांनी आयोजित केला होता.

भाविकांची पळापळ
आग लागली तेव्हा यज्ञशाळेत शेकडो भाविक उपस्थित होते. आग लागताच सर्वांची एकच पळापळ झाली. सुदैवाने, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे अधिकृत वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस दल बचाव कार्यासाठी घटनास्थळी तैनात आहेत.

सुरक्षेचा प्रश्न: अयोध्येत सध्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. अशा वेळी यज्ञशाळा आणि पंडालमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? याची चौकशी आता सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire at Ayodhya Yagya: Coconut Explosion Ignites Pandals, Chaos Ensues

Web Summary : A major fire erupted at an Ayodhya Yagya Shala after a coconut exploded during rituals. The blaze quickly spread, consuming nearby pandals. Hundreds fled the scene. Firefighters are battling the flames. An investigation into safety standards is underway.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याfireआग