शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयावरील टीका भोवणार?; अवमान प्रकरणी कुणाल कामरांविरोधात खटला चालणार

By कुणाल गवाणकर | Updated: November 12, 2020 21:14 IST

सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे कामरा अडचणीत

नवी दिल्ली: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचं म्हणत विधि शाखेच्या एका विद्यार्थ्यानं आणि दोन वकिलांनी ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरोधात केलेल्या ट्विट प्रकरणी कामरा यांच्या विरोधात खटला चालवला जाण्याची परवानगी ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली. 'सर्वोच्च न्यायालयावर विनाकारण टीका केल्यानं शिक्षेचा सामना करावा लागू शकतो, हे लोकांना समजायला हवं. विनोद आणि अपमान यांच्यात एक सीमारेषा असते. कामरा यांच्या ट्विटनं ती सीमा ओलांडली आहे,' असं वेणुगोपाल म्हणाले.'कामरा यांचं ट्विट सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीश यांच्या निष्ठेचं अपमान करणारं आहे. आज काल लोक अतिशय उघडपणे सर्वोच्च न्यायालयावर टीका करतात. त्यांना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटतं,' असं वेणुगोपाल यांनी म्हटलं. कामरा यांच्या ट्विटला विधि शाखेचा विद्यार्थी शिरांग कटनेश्‍वरकर आणि दोन वकिलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर २४ तासांच्या आत वेणुगोपाल यांनी कामरा यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली. त्यामुळे कामरा यांच्या अडचणी वाढणार आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामी