शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम बंद, बँकांतही सुटे नाहीत

By admin | Updated: November 17, 2016 02:24 IST

बँकांतून १00 रुपयांच्या पाच नोटांचा एकूण साडेचार हजार रुपये बदलून मिळतील, बँकेतून एकावेळी २४ हजार रुपये काढता येतील, एटीएममध्ये

मुंबई : बँकांतून १00 रुपयांच्या पाच नोटांचा एकूण साडेचार हजार रुपये बदलून मिळतील, बँकेतून एकावेळी २४ हजार रुपये काढता येतील, एटीएममध्ये बदल करणे सुरू असून, अनेक एटीएम सुरूही झाले आहेत, पैसे बदलुन घेणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल, अशा अनेक गोष्टी केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असल्या तरी बहुसंख्य भागात प्रत्यक्षात यापैकी काहीच होत नसल्याचे बुधवारी आढळून आले. त्यामुळे बँकांच्या पुढे प्रचंड रांगा कायम होत्या. एटीएम सुरू झाली का, हे पाहायला येणारे खातेदार ती बंद असल्याने निराश व नाराज होत होते. पैसे बदलून घेणाऱ्यांच्या संख्येत कमी झाल्याचे कुठेच आढळून आले नाही. गर्दी कायम असल्याने लोकांच्या हातात आजही पुरेशी रोकड नाही, हे उघड झाले आहे.अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या नोटाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळ चार हजार रुपयेच बदलून दिले जात आहेत. देशभरातील ८0 टक्के एटीएम अद्याप बंद आहेत वा त्यांचे सर्व्हर बंद आहेत. ज्यांचे सर्व्हर सुरू आहेत, त्यात १00 रुपयांच्या नोटाच नाहीत. शिवाय एटीएममधून दोन हजार रुपये येण्यासाठी जे बदल करणे गरजेचे आहेत, ते झालेलेच नाहीत. खातेदाराला एका आठवड्यात २४ हजार ५00 रुपये काढता येतील, अशीही घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात गुरुवारी वा शुक्रवारी बँकेतून १0 हजार रुपये काढलेल्या ग्राहकांना आता तुम्हाला केवळ १४ हजार रुपये काढता येतील, कारण याच आठवड्यात १0 हजार रुपये काढले आहेत, असे सांगण्यात येत होते. आठवडा म्हणजे कॅलेंडर आठवडा नव्हे, तर एकदा रक्कम काढून सात दिवस पूर्ण झाल्यानंतरच खातेदारांना दुसऱ्यांदा रक्कम काढता येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)