आसाम - सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

By Admin | Updated: August 20, 2014 10:13 IST2014-08-20T10:10:52+5:302014-08-20T10:13:03+5:30

आसामधील चिरांग जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान एनएफडीबीचे ( नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड) ५ दहशतवादी मारले गेले.

Assam - Five terrorists killed in encounter with security forces | आसाम - सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

आसाम - सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

>ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २० - आसामधील चिरांग जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान एनएफडीबीचे ( नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड)  ५ दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास रुनिखाटा पोलिस स्थआनकात अतंर्गत येणा-या रैमती जंगलाच्या परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाच जणांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून एके रायफल, पाच पिस्तुल. सहा मॅगझीन्स, ६० काडतूस आणि एक लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Assam - Five terrorists killed in encounter with security forces