शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याला हवी सीमापार हल्ल्याची परवानगी

By admin | Updated: September 20, 2016 05:47 IST

उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे.

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे. ७७८ कि.मी.च्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करण्याची मागणी सैन्याकडून होऊ शकते. मर्यादित पण, दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक इशारा देण्याचा यामागचा हेतू आहे. काश्मिरातील घुसखोरीत झालेली वाढ पाहता सरकारला सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा एक मतप्रवाह आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या भूभागात हल्ला किंवा गुप्त सैन्य अभियान, अशी कारवाई तूर्तास तरी होऊ शकत नाही. कारण, नियंत्रण रेषा न ओलांडताही भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करू शकते. सैन्य दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेही मत आहे की, कडक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश द्यायला हवा की, झाले ते पुरे झाले. पठाणकोट, मुंबई हल्ल्यासारखे अतिरेकी हल्ले आम्ही किती दिवस सहन करणार आहोत. याचा बदला आम्ही घेणार नाही का? आमचा हा दृष्टिकोन पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे धैर्य वाढवत आहे. यावर उपाय म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचाही पर्याय आहे. ९० कि.मी. हल्ल्याची क्षमता असलेल्या रॉकेटपासून ते २९० कि.मी.ची क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही वापर करता येऊ शकतो. प्रखर हवाई हल्ल्यामध्ये मिराज २०००, जग्वार आणि सुखोई-३० यांचा वापर करता येऊ शकतो; पण ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल, असा एक मतप्रवाह आहे. कारण, पाकिस्तानची सुरक्षाप्रणाली ही भारताच्या हवाई दलाचे नुकसान करू शकते, तर पाकिस्तानविरुद्धचा एक हल्लाही युद्धात रूपांतरित होऊ शकतो आणि पाकिस्तानने हे वारंवार सांगितलेले आहे की, ते भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करु शकतात.