शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

14 एप्रिल: सारोळे फोकस..

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने
दोन महिन्यांनंतर विजयकुमार काळम-पाटील यांच्या रूपाने महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला. चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर महापालिकेची विकासकामे खोळंबली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आता करायचे काय, असा सर्वांसमोर प्रश्न आहे. अशा अवस्थेत सूत्रे हाती घेतल्यानंतर काळम-पाटील यांनी लागलीच स्थितीचा अभ्यास करून उत्पन्नाच्या स्रोताकडे लक्ष केंद्रित केले आहे. असे असताना नागरिक सध्या दररोज ज्या समस्येला तोंड देत आहेत तो म्हणजे पाणी व कचरा हा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. पाण्यावर कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च झाले आहेत. पण पाण्याचे नियोजन जमलेले नाही. तीन व चार दिवसाआड पाण्याचे नियोजन झालेले आहे. पण या नियोजनाप्रमाणे कोठेच पाणी जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. शहरात पाणी कमी मिळते ही ओरड आहे, तर हद्दवाढ भागात विशेष करून विडी घरकूल परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याबाबत नागरिकांची ओरड वाढल्यावर पदाधिकार्‍यांनी कंबर कसली. नांदणीचा बीपीटी (ब्रेक प्रेशर टँक) कार्यान्वित झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्या तीन पंप सुरू आहेत. यातून आणखी एक पंप वाढविता येईल. यातून 10 ते 15 एमएलडी पाणी वाढेल, असा अंदाज आहे. 1 मेपासून हे नियोजन अपेक्षित आहे. त्या भरवशावर पदाधिकारी लोकांना आश्वासन देत आहेत, पण हे गणित चुकणार आहे. सध्या बर्‍याच भागात नियोजनानुसार पाणी जात नाही. पाणी थोडे वाढले तर हेच वेळापत्रक दुरुस्त होईल. पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा मृगजळच ठरणार आहे. मेच्या कडाक्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि ही समस्या आपोआप सुटेल. पण सध्या लोकांचा संताप पाहता सदस्यांना प्रभागात फिरणे मुश्कील झाले आहे. एकतर चार दिवसाआड पाणी आणि तेही वेळेवर व व्यवस्थित दाबाने वितरित होत नाही. अशात वर्षभराची पाणीप?ी का घेता, असा लोकांचा संताप आहे. गतवर्षी पाणीप?ी माफ करण्याचे गाजर दाखविण्यात आले. यंदाही हीच स्थिती आहे. करवसुलीसाठी तर महापालिकेची पथके फिरत आहेत. पण नागरी सुविधेच्या नावाने मोठी बोंब होत आहे. घंटागाड्यांचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. गल्लोगल्लीचा कचरा रस्त्यावर आला आहे. पाणी व कचर्‍याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
?राजकुमार सारोळे