शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावाप्रमाणे चार आठवड्यांत मावेजा द्या

By admin | Updated: June 19, 2015 14:10 IST

खंडपीठ : रस्ता रुंदीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला द्या

खंडपीठ : रस्ता रुंदीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला द्याऔरंगाबाद : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी जानेवारी २०१२ मध्ये संपादित केलेल्या मालमत्तेचा मावेजा बाजारभावाप्रमाणे चार आठवड्यांत अदा करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी दिले. शहर रस्ता रुंदीकरणात आड येणार्‍या मालमत्ता संपादित करण्यासाठी महापालिकेने रोशनगेट येथील शेख सांडू ताज मोहम्मद पटेल व महेबूब खान अजीज खान यांचे घर पाडून जागा संपादित केली होती. यासाठी पालिकेने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबिली नव्हती. या मोबदल्यात शेख सांडू यांना टी.डी.आर. किंवा रोख ९ लाख ९१ हजार ९८० रुपये आणि महेबूब खान यांना २२ लाख ९६ हजार ९७० रुपये घेण्याची सक्ती पालिकेने केली होती. मनपाच्या दंडेलशाही विरुद्ध शेख सांडू व महेबूब खान यांनी ॲड. एस. एस. काझी यांच्यामार्फत खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यात भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. ही याचिका सुनावणीसाठी आली असता, मनपातर्फे युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांनी २०१३ मध्येही खंडपीठात याचिका केली होती व खंडपीठाने ती फेटाळली होती. याचिकाकर्त्यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची सूचना खंडपीठाने केली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सदर याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. भूसंपादन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे बाजारभावाने याचिकाकर्त्यांना मोबदला देण्याची विनंती ॲड.काजी यांनी याचिकाकर्त्यातर्फे न्यायालयास केली. यावर निकाल देताना याचिकाकर्त्यांनी भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मावेजा पास करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा आणि संबंधितांनी चार आठवड्यांत मावेजा द्यावा, असे आदेश दिले.