शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेनामी’वर घाला घालणार

By admin | Updated: December 26, 2016 05:22 IST

बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक वर्षे दाबून ठेवला, असा आरोप करतानाच

नवी दिल्ली : बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक वर्षे दाबून ठेवला, असा आरोप करतानाच, आता तो अधिक कठोरपणे लागू करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘नोेटाबंदीच्या घोषणेच्या दिवशीच मी म्हणालो होतो की, ही लढाई असामान्य आहे. ७० वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या काळ्या व्यवहारात कोण-कोण जोडले गेलेले आहे? अशा लोकांशी दोन हात करण्याचे मी ठरविले आहे, तर असे लोकही सरकारला पराजित करण्यासाठी दररोज नव्या युक्त्या अवलंबित आहेत. त्यासाठी आम्हालाही त्यांच्याविरुद्ध नवी पद्धत वापरावी लागते.’ मोदी म्हणाले की, ‘आपल्या देशात बेनामी मालमत्तेबाबत एक कायदा आहे. १९८८ मध्ये हा कायदा तयार झालेला आहे, पण तो तसाच पडून आहे. आम्ही आता अधिक कठोरपणे तो आणणार आहोत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरुद्धच्या महायज्ञात लोकांनी उत्साहात सहभाग घेतला आहे. जर सभागृहाचे कामकाज चालले असते, तर चांगली चर्चा झाली असती असे सांगून ते म्हणाले की, राजकीय निधीबाबत सभागृहात चर्चा व्हावी, अशी आपली इच्छा होती. मोदी म्हणाले की, काही लोक अफवा पसरवीत आहेत की, राजकीय पक्षांना सर्व सूट आहे; पण हे चूक आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. दरम्यान, सातत्याने बदलत असणाऱ्या नियमांबाबतही विचारणा होत आहे; पण लोकांच्या सोयीसाठीच हे नियम वारंवार बदलले जात आहेत. आपण सध्या विविध माध्यमांतून हे बघत असाल की, रोज नवनवे लोक पकडले जात आहेत. नोटा पकडल्या जात आहेत. छापे मारले जात आहेत. हे कसे शक्य झाले? नोटाबंदीनंतर अनेक अफवा पसरल्या. म्हणे, नोटेवरील स्पेलिंग चुकीचे आहे, कोणी म्हणते की, मिठाचे दर वाढले. दोन हजार रुपयांची नोटही जाणार आहे. ५०० आणि १०० च्या नोटाही जाणार आहेत; पण या अफवांनंतरही देशवासीयांनी जे सामर्थ्य दाखविले त्याला मी शतशत नमन करतो. क्रिकेट, हॉकी संघाचे केले कौतुक‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघ व ज्युनिअर हॉकी संघाचे अभिनंदन केले. भारतीय क्रि केट संघाने इंग्लंडवर ४ -० असा विजय मिळविला आहे, तर, ज्युनिअर हॉकी संघ विश्वविजेता ठरला आहे.