शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

जेलर करत होता खलिस्तानी अमृतपाल सिंगला मदत; दिब्रुगड तुरुंगातून स्पाय कॅम अन् फोन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 15:09 IST

Dibrugarh Central Jail: खालिस्तानी संघटना ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगला मदत केल्याप्रकरणी जेलरला ताब्यात घेतले आहे.

Dibrugarh Jailor Arrested: आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक(जेलर) निपेन दास यांना शुक्रवारी (8 मार्च) अटक करण्यात आली. दास यांच्यावर 'वारिस पंजाब दे', या खलिस्तानी संघटनेशी संबंधित अमृतपाल सिंग (Amripal Singh) आणि त्याच्या साथीदारांना मदत केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी या कैद्यांकडून स्मार्टफोन, स्पायकॅमसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, तुरुंग अधिकाऱ्याला पहाटेच गुन्हेगारांची मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सध्या त्याला दिब्रुगड सदर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच दिब्रुगढ सेंट्रल जेलमधून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. 

सिमकार्ड, फोन आणि टीव्हीचे रिमोटही जप्त 

लीस महासंचालक (डीजीपी) जी पी सिंग यांनी सांगितले की, तुरुंगाच्या परिसरात झडती घेतली असता सिमकार्डसह स्मार्टफोन, एक सामान्य फोन, कीबोर्डसह टीव्ही रिमोट, स्पायकॅम पेन, पेन ड्राइव्ह, ब्लूटूथ हेडफोन आणि स्पीकर यासारख्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

अमृतपाल सिंगही याच तुरुंगात 

खलिस्तान समर्थक संघटना 'वारीस पंजाब दे' (WPD) प्रमुख अमृतपाल आणि त्याचे 10 साथीदार दिब्रुगड तुरुंगात कैद आहेत. या कट्टरपंथी गटावरील कारवाईदरम्यान या लोकांना पंजाबच्या विविध भागांतून राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून हे सर्वजण या तुरुंगात आहेत. या सर्वांना तुरुंगात आणल्यानंतर तुरुंगात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तरीदेखील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे कशी आली, याचा सोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :AssamआसामjailतुरुंगPunjabपंजाबPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी