शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:04 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नसल्याचे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले.

RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभरात 'शताब्दी वर्ष' मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. याच निमित्ताने कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे आयोजित एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हजेरी लावली. यावेळी, संघात मुस्लिमांना प्रवेशाची परवानगी आहे का, या एका महत्त्वाच्या आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट उत्तर दिले, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. तो फक्त धोरणांना पाठिंबा देतो, पक्षांना नाही. संघाची विचारसरणी सर्वसमावेशक आहे आणि ही त्याची कार्यशैली आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं. संघात मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मीयांना प्रवेशाची परवानगी आहे का, या प्रश्नावर मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, संघात कोणत्याही विशिष्ट जातीला (ब्राह्मण किंवा अन्य) किंवा पंथाला (मुस्लिम किंवा ख्रिश्चन) स्वतंत्रपणे मान्यता नाही.

भागवत म्हणाले, "संघात कोणत्याही ब्राह्मण, कोणत्याही अन्य जातीला, कोणत्याही मुसलमान किंवा ख्रिश्चनाला ओळखीच्या आधारावर प्रवेश दिला जात नाही. इतर कोणत्याही जातीला स्वतंत्रपणे मान्यता दिली जात नाही. लोकांना फक्त हिंदू म्हणून स्वीकारले जाते. म्हणून, वेगवेगळ्या धर्माचे लोक संघात सामील होऊ शकतात, परंतु त्यांनी त्यांची वेगळी ओळख मागे सोडली पाहिजे. तुमचे वेगळेपण स्वागतार्ह आहे, परंतु जेव्हा तुम्ही शाखेत याल तेव्हा तुम्ही भारतमातेचा पुत्र आणि या हिंदू समाजाचा सदस्य म्हणून याल."

संघ सर्व भेदभावांपासून अलिप्त राहून कार्य करतो, हे स्पष्ट करताना भागवत पुढे म्हणाले की, "मुसलमान शाखेत येतात, ख्रिश्चन शाखेत येतात, जसे तथाकथित हिंदू समाजातील अन्य जातींचे लोकही शाखेत येतात. पण आम्ही त्यांची संख्या नोंदवत नाही आणि ते कोण आहेत, हे विचारतही नाही. आम्ही सर्व भारत मातेचे पुत्र आहोत. संघ याच पद्धतीने कार्य करतो."

पाकिस्तानवर कठोर भूमिका

याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरही आपले मत मांडले. "भारत नेहमीच पाकिस्तानसोबत शांतता ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण पाकिस्तानला ती नको आहे. जोपर्यंत पाकिस्तानला भारताचे नुकसान करण्यात समाधान मिळत राहील, तोपर्यंत ते हे करतच राहतील. त्यांच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांना आपल्याला कडक प्रत्युत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा अर्थ असा नाही की भारताने स्वतःहून कोणतेही करार तोडावेत. जर पाकिस्तानने करार मोडले, तर त्यांना यश मिळणार नाही, उलट ते स्वतःसाठीच अडचणी निर्माण करतील," असा इशाराही भागवत यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Muslims, Christians can join RSS, but leave identity behind: Bhagwat

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated that while Muslims and Christians can join RSS shakhas, they must identify as sons of Bharat Mata and members of Hindu society, setting aside separate identities. He emphasized inclusivity, but within a Hindu framework.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBengaluruबेंगळूर