शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Mahalaxmi Kirnotsav 2025: मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 21:16 IST

Mahalaxmi Kirnotsav 2025 Celebration: श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन कालखंडातील पारंपरिक किरणोत्सव सोहळा रविवारपासून सुरू झाला. शनिवारी झालेल्या चाचणीत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी किरणोत्सवाला प्रारंभ झाला. ढगांचा अडथळा नसल्यामुळे आणि निरभ्र आकाशामुळे मावळतीच्या सुवर्णकिरणे श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या कानापर्यंत पोहोचली. सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरु झालेला हा प्रवास ५ वाजून ४७ मिनिटांनी पूर्ण झाला. या सोहळ्याचे हजारो भाविक साक्षीदार ठरले.

श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन कालखंडातील पारंपरिक किरणोत्सव सोहळा रविवारपासून सुरू झाला. शनिवारी झालेल्या चाचणीत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली होती. रविवारी पार पडलेल्या किरणोत्सवानंतर मंदिरात देवीची आरती होउन हा साेहळा पार पडला. हजारो भाविकांंसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, किरणोत्सव अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यावेळी उपस्थित होते.

किरणोत्सवाचा प्रवाससायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी किरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर ५ वाजून १४ मिनिटांनी गरुड मंडपामागे, ५ वाजून २३ मिनिटांनी गणपती मंदिरामागे, ५ वाजून २८ मिनिटांनी कासव चौक, ५ वाजून ३२ मिनिटांनी पितळी उंबरठा, ५ वाजून ३५ मिनिटांनी चांदीचा उंबरठा, ५ वाजून ३७ मिनिटांनी संगमरवरी पहिली पायरी, ५ वाजून ४० मिनिटांनी संगमरवरी तिसरी पायरी, ५ वाजून ४१ मिनिटांनी कटांजन असे टप्पे पूर्ण करत ५ वाजून ४२ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४५ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत आणि ५ वाजून ४७ मिनिटांनी मूर्तीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून लुप्त झाली.

गाभाऱ्यातील आर्दता ३५ च्या आत

स्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशाची रविवारी किरणोत्सवाला चांगली साथ लाभली. गाभाऱ्यातील आर्दता ३५ च्या आत होती. पुढील दोन दिवसांत किरणे देवीच्या मुखकमलावर पोहाचण्यात कोणताही अडथळा नाही. आता १३ आणि १४ तारखेपर्यंत देवीच्या चेहऱ्यावर किरणे पोहोचून या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.

भाविकांची प्रचंड गर्दी

अंबाबाईच्या या किरणोत्सवाचे साक्षीदार बनण्यासाठी हजारो भाविकांनी रविवारी सायंकाळी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. दर्शन घेतल्यानंतरही अनेकजण थांबून राहिले होते. अनेकांनी मंदिराच्या आवारात लावलेल्या स्क्रीनवर या किरणोत्सवाचा आनंद घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Golden rays touch Ambabai; Thousands witness Dakshinayan Kiranotsav.

Web Summary : Ambabai temple's Kiranotsav began Sunday. Golden rays touched the deity's ears amidst clear skies. Thousands witnessed this spectacle, marking the Dakshinayan period. The event concluded with aarti, attended by officials and devotees. The rays are expected to reach the face in the coming days.
टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरViral Videoव्हायरल व्हिडिओspiritualअध्यात्मिक