शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 06:58 IST

Major Conspiracy of Terrorists Foiled: गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

अहमदाबाद - गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली व अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील 'इस्लामिक स्टेट' शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली.'एटीएस' नुसार, डॉ. सय्यद हा उच्चशिक्षित व कट्टरवादी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे आणि त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्याने आखली होती. त्याचा खुरासान येथील म्होरक्या पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्रे पाठवत होता. 

दोघे उत्तर प्रदेशातीलडॉ. सय्यद व्यतिरिक्त अन्य दोन आरोपी आझाद सुलेमान शेख व मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.या दोघांनी कथितरीत्या राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्रे मिळवून ती डॉ. सय्यदला पुरवली होती. डॉ. सय्यद याला १७नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

'सीडीआर'मधून माहिती बाहेरया तिघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून ते अनेक संवेदनशील शहरांची माहिती घेत होते. त्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, यांचा संबंध एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे काय, याचा तपास सुरू आहे.

अशी झाली होती तयारीया डॉक्टरने साथीदारांच्या मदतीने दहशतवादी हल्ला करण्यासाठी एरंडीच्या बियांवर रासायनिक संशोधन सुरू केले होते. यासाठी आवश्यक उपकरणे, कच्चा मालही जमा करून ठेवला होता. विष तयार करण्यासाठी आवश्यक प्रारंभीची रासायनिक प्रक्रियाही त्याने सुरू केली होती.

काय आहे रिसिन विष?एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते.

डॉ. सय्यदचे कारनामेएटीएसच्या चौकशीत डॉ. सय्यदने दिलेल्या माहितीनुसार, भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने गांधीनगर जिल्ह्यात कलोलमध्ये एका निर्मनुष्य जागी शस्त्रे जमवली होती.त्यांचा म्होरक्या अबू खदिजा हा मूळ अफगाणिस्तानचा असून इस्लामिक स्टेटशी (खुरासान) संबंधित आहे. पाकिस्तानमधील अनेकांच्या तो संपर्कात होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Terror plot foiled: Ricin poison, weapons seized; three arrested.

Web Summary : Gujarat ATS busted a terror plot involving ricin poison. Three, including a doctor, were arrested for planning attacks in Lucknow, Delhi, and Ahmedabad. Weapons and ricin poison were seized. The group was linked to Islamic State.
टॅग्स :terroristदहशतवादीGujaratगुजरात