अमित शहांच्या सभेत हार्दिक समर्थकांचा हैदोस

By Admin | Updated: September 9, 2016 05:13 IST2016-09-09T05:13:07+5:302016-09-09T05:13:07+5:30

रुवारी सायंकाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत हार्दिक पटेलच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून हैदोस घातला व खुर्च्यांची मोडतोड केली.

Amit Shah's meeting with hearty supporters | अमित शहांच्या सभेत हार्दिक समर्थकांचा हैदोस

अमित शहांच्या सभेत हार्दिक समर्थकांचा हैदोस

सूरत : गुजरात मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या पाटीदार (पटेल) समाजाच्या प्रमुख नेत्यांचा सत्कार करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत हार्दिक पटेलच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून हैदोस घातला व खुर्च्यांची मोडतोड केली.
अमित शहा व्यासपीठावर बसलेले असताना व केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला भाषण करत असताना श्रोत्यांमधून ‘हार्दिक, हार्दिक’ अशा घोषणा सुरु झाल्या व त्यानंतर अनेकांनी उठून गोंधळ घातला.
हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने या सत्कार सभारंभास विरोध केला होता. मात्र तो झुगारून शहरातील प्रमुख पाटीदार व्यापाऱ्यांनी ‘पाटीदार अभिवादन समिती’ स्थापन करून हा सत्कार समारंभ आयोजित केला
होता.

Web Title: Amit Shah's meeting with hearty supporters