अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:42 IST2026-04-30T12:42:29+5:302026-04-30T12:42:57+5:30
Himachal Pradesh Wedding News: बदलत्या काळासोबत सध्या समाजात होणारी काही लग्नं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये एक लग्न चर्चेत आलं आहे. येथे ६६ वर्षांच्या एका वृद्धाने ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं आहे.

अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न
बदलत्या काळासोबत सध्या समाजात होणारी काही लग्नं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी दोन भावांनी एकाच मुलीशी केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता हिमाचलमधील आणखी एक लग्न चर्चेत आलं आहे. येथे ६६ वर्षांच्या एका वृद्धाने ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील बंजार क्षेत्रात असलेल्या थरिम्बला गावातील ६६ वर्षांच्या सोम देव यांनी ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं. या लग्नाला आता एक महिना लोटला आहे. तसेच आता या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
यापैकी एका व्हिडीओमध्ये सोमदेव आणि त्यांची पत्नी रस्त्याने जात असताना एक महिला त्यांना विचारते की, तुम्हा दोघांमधील नातं काय आहे? त्यावर सोम देव यांनी आम्ही पती पत्नी आहोत, असे सांगितले. तसेच आपलं वय ६६ वर्षे आणि पत्नीचं वय ३५ वर्षे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आपली पत्नी सैंज येथील तरमेडा येथील रहिवासी आहे, अशेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ती महिला त्या दोघांनाही आनंदी राहा, असे सांगते. तसेच पतीची सेवा कर असा सल्ला त्या तरुणीला देते. त्यावर ती तरुणीही होकार देते.
दरम्यान, या लग्नाची आणि पती-पत्नीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तसेच ते नाच-गात अललेले व्हिडीओ शेअर केले जात आहेत. काही युझर्स जोड्या वर जुळवल्या जातात, असे म्हणत आहेत. तर एकाने मात्र ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी ही बातमी जखमेवर मीठ चोळणारी आहे, असे म्हटले आहे.