कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:24 IST2026-04-30T13:18:40+5:302026-04-30T13:24:53+5:30

इटालियन फॅशन ब्रँड असलेल्या प्राडा'ने अखेर कोल्हापूरी चप्पलच्या कलेचे महत्त्व मान्य केले. महाराष्ट्र, कर्नाटकातील कुशल कारागिरांची मदत घेऊन मर्यादित आवृतीतील नवीन चप्पल सोमवारी बाजारात आणली.

Kolhapuri brand 'Prada' accepts, new slippers in the market; 30 people get training opportunity in Italy | कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी

कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी

कोल्हापूर -  इटालियन फॅशन ब्रँड असलेल्या प्राडा'ने अखेर कोल्हापूरी चप्पलच्या कलेचे महत्त्व मान्य केले. महाराष्ट्र, कर्नाटकातील कुशल कारागिरांची मदत घेऊन मर्यादित आवृतीतील नवीन चप्पल सोमवारी बाजारात आणली. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल नव्याने जगासमोर पोहोचली आहे अशी माहिती 'प्राडाने सोशल मीडिया आणि त्यांच्या ऑनलाइन फ्लॅटफॉर्मवर दिली आहे. ती महाराष्ट्र व कर्नाटकातील ३०० कारागिरांना प्रशिक्षण देणार आहे

कोल्हापुरी चप्पल नव्याने जगासमोर आल्याने राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक जपले गेले आहे. तसेच उत्पादनाचे मूळ स्थान जतन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी प्राडाने उन्हाळी फॅशन महोत्सवात सादर केलेल्या चपलांचे पेटंट व डिझाइन कोल्हापुरी होते. त्यांची विक्री प्रतिजोडी सुमारे 1.7 लाख ते 2.10 लाख रुपयांना होती. त्याचे श्रेय कोल्हापूर आणि कारागीरांना दिले नसल्याने वाद निर्माण झाला होता.

याप्रकरणी जुलै व ऑक्टोबरमध्ये प्राडाचे पथक कोल्हापुरात आले होते. त्यांनी येथील कारागीर, उत्पादक, विक्रेत्यांशी संवाद साधून चप्पलचा ढाचा, कलाकुसरीची माहिती घेतली. या हस्तकलेचा जगभर पोहोचविण्यासाठी कारागिरांना सहकार्य, कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सरकारने दखल घेऊन मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात लिडकॉम आणि प्राडा यांच्यात सामंजस्य करार केला होता.

डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी प्राडाने बाजारात नवी चप्पल आणली. या नव्या चप्पलचा संग्रह त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटकातील पारंपारिक कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कुशल कारागिरांकडून तयार करून घेतला. त्यासाठी संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कार्पोरेशन (लीडकॉम) आणि डॉ. बाबू जगजीवन राम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशन (लिडकर) यांचे सहकार्य मिळाले. त्याबाबतची माहिती प्राडाने सोशल मीडिया आणि त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिली आहे.

प्राडा ३०० कारागिरांना प्रशिक्षण देणार 

प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपल करून देणार आहे. त्यामुळे राज्यातील पारंपरिक कारागिरांना आधुनिक कौशल्यांची जोड मिळणार आहे. प्रशिक्षण नॅशनल इन्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (आयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर ॲड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल. त्यापैकी सर्वोतम ३० कारागिराना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यात डिझाइन, तांत्रिक कौशल्ये, डिजिटल साधने आणि बाजारपेठेतील ट्रेंडस यांचा समावेश असेल.

मूळ ढाचा बदलू नये

कोल्हापुरी चप्पलपासून प्रेरणा घेऊन प्राडाने नवीन चप्पल तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी मौजे पुडा कापशी या कोल्हापुरी चप्पलच्या ढाच्याचा आधार घेतला आहे. नवीन चप्पल बाजारात आणताना त्यांनी मूळ ढाचा बदलू नये अशी अपेक्षा चप्पल व्यवसायिक दीपक खांडेकर यांनी व्यक्त केली.

Web Title : प्राडा ने कोल्हापुरी शिल्प को अपनाया, नई चप्पलें लॉन्च, इटली में प्रशिक्षण

Web Summary : प्राडा ने कोल्हापुरी चप्पलों को सराहा, भारतीय कारीगरों के साथ एक नई लाइन लॉन्च की। वे 300 कारीगरों को प्रशिक्षित करेंगे, इटली में उन्नत प्रशिक्षण देंगे। इससे सांस्कृतिक विरासत का संरक्षण और स्थानीय कौशल का सशक्तिकरण होगा।

Web Title : Prada Embraces Kolhapuri Craft, Launches New Chappals, Offers Italy Training

Web Summary : Prada acknowledges Kolhapuri chappals, launching a new line made with Indian artisans. They will train 300 artisans, offering advanced training in Italy. This preserves cultural heritage and empowers local skills.