शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला अल्टो कार, मतदारसंघातील विद्यार्थ्यांना सायकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 16:52 IST

जगरनाथ यांनी यापूर्वीच घोषणा केली होती, जॅक बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्टो कार गिफ्ट देण्यात येईल.

ठळक मुद्देजगरनाथ यांनी यापूर्वीच घोषणा केली होती, जॅक बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्टो कार गिफ्ट देण्यात येईल.

रांची - झारखंडचे शिक्षणमंत्री 2 ऑल्टो कार, एक मोटारसायकल आणि जवळपास 300 सायकलींची खरेदी केली आहे. झारखंड अकॅडमीक कॉन्सिलच्या (जॅक) परीक्षांच्या निकालाची घोषणा करत शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्स विद्यार्थ्यांना अल्टो कार देणार असल्याचं सांगतिलं. शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी दिलेला शब्द पाळत, लवकरच या कार, मोटारसायकल व सायकलींचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे. 

जगरनाथ यांनी यापूर्वीच घोषणा केली होती, जॅक बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्टो कार गिफ्ट देण्यात येईल. त्यासोबतच, दहावीच्या परीक्षेत बोकारो जिल्ह्याशिवाय त्यांच्या डुमरी या विधानसभा मतदारसंघातील 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून पास होतील, त्यांना सायकल भेट देण्यात येईल. त्यानुसार, आता 303 विद्यार्थ्यांमध्ये अल्टो कार, सायकल आणि दुचाकीचे वाटप होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी रांची येथे राज्यातील टॉपर विद्यार्थ्याला अल्टो कार भेट देण्यात येईल, असे महतो यांनी सांगितले. झारखंड कोशरी विनोद बिहारी यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात हे बक्षीस देण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी महतो यांनी बुधवारी अल्टो कार, दुचाकी आणि 300 सायकलींची खरेदी केली आहे. विद्यार्थ्यांना हे गिफ्ट देण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती जागरुकता आणि उत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देणे असल्याचं महतो यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी यंदा अकरावीला प्रवेश घेतला आहे. 

अकरावीला प्रवेश शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी वयाच्या 52 व्या वर्षी येथील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील कला शाखेत इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे. राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. शिक्षणाला वयाची अट नसते, तर दुसरीकडे मी केवळ दहावी पास असून 10 वी पास आमदाराला मंत्री केल्याची टीकाही माझ्यावर सातत्याने करण्यात येत होती. या टीकाकारांना उत्तर देण्याचं काम मी केलंय, असे मंत्री महतो यांनी म्हटलंय. दहावीनंतर राजकारणात उडी घेतल्याने आपले शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.  

टॅग्स :ranchi-pcरांचीexamपरीक्षाEducationशिक्षणssc examदहावी