शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये दहशतवादी संघटनेचे सर्व म्होरके अटकेत

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

लष्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीम

लष्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीम
गुवाहाटी- आसाममध्ये भारतीय सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर्स (केपीएलटी) या दहशतवादी संघटनेच्या सर्व म्होरक्यांना शस्त्रसाठ्यासह अटक केली.
गुप्त सूचनेच्या आधारे सेनेच्या रेड हॉर्न डिव्हिजनने आसाम पोलिसांच्या मदतीने गेल्या १४ फेब्रुवारीच्या रात्री केपीएलटीच्या जहाल दहशतवाद्यांविरुद्ध सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत १५ तारखेला सर्वप्रथम संघटनेचा स्वयंभू अर्थ सचिव, अंकेक्षक आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला रांगस्कोप गावात ताब्यात घेण्यात आले. या तीन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री तापतजवळील आमरिंग वनक्षेत्रात दहशतवाद्यांचे एक मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश आले. याठिकाणी केपीएलटीचा कमांडर इन चीफ, डेप्युटी चीफ आणि एरिया कमांडरसह सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. हामरेन उपविभागातील लाचेंग भागात आणखी काही दहशतवादी दडून बसले असल्याचे त्यांच्याकडून कळले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेना आणि पोलिसांनी तात्काळ या क्षेत्राची घेराबंदी केली. मंगळवारी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि जंगलाच्या दिशेने पळून गेले. उभय बाजूने सुमारे अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर आणखी पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत अटक झालेल्या दहशतवाद्यांची संख्या १५ झाली आहे.
लष्कराने ईशान्येकडील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात यशस्वी अभियान असल्याचे म्हटले आहे. या अभियानाने केपीएलटीचा जवळपास सफाया झाला आहे,असा दावा लष्कराच्या सूत्रांनी केला.
(वृत्तसंस्था)