शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र राहण्यावर ठाम असलेल्या सासू-जावयाला गावात नो एन्ट्री; आली उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:00 IST

सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून पळून गेल्यानंतर चर्चेत आलेल्या सासू आणि जावयाची जोडी आता फक्त यूपीमध्येच नाही तर यूट्यूबवरही लोकप्रिय झाली आहे. पण आता दोघांवरही उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ आली आहे. सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही. यानंतर ते दोघे कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण दोघांनीही उत्तर प्रदेश सोडल्याचं म्हटलं जात आहे.

गावात परत आल्यानंतर सासूला जावयासोबतचं राहायचं होतं. हे दोघंही एकत्र राहण्यावर ठाम होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना गावात घेतलं नाही. तसेच राहुलला त्याच्या वडिलांनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. राहुलचे वडील होरीलाल यांना हे नातं मान्य नाही. माझ्यासाठी माझा मुलगा मेला आहे असं त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं. यानंतर दोघेही जवळच्या गावांमध्ये दोन दिवस राहिले. मग त्यांनी उत्तर प्रदेश सोडलं आणि एक नवीन जीवन सुरू केलं.

"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

पोलीस किंवा तरुणाच्या वडिलांकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं आहे. आमच्या कुटुंबाचा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही. ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले होते. याच दरम्यान सासूने दिली  आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं होतं. 

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...

जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश