शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:23 IST

लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्याच्या सासूसोबत पळून गेला.

उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्हा आजकाल सासू आणि जावयाच्या अनोख्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आहे. या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्याच्या सासूसोबत पळून गेला. पोलिसांनी राहुलच्या मित्रांना ताब्यात घेतलं आहे. राहुल आणि अनिता यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना झालं आहे.

६ एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याआधीही एका महिलेसोबत पळून गेला होता. ती महिला शेजारच्या गावातील होती. दोघेही दोन महिन्यांनी घरी परतले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली नाही, त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. यावेळी राहुल त्याच्या होणार्‍या सासूसोबत पळून गेला आहे. 

राहुल आणि अनिता एकमेकांच्या पडले प्रेमात

जितेंद्र आणि अनिता यांच्या मुलीचं लग्न १६ एप्रिल रोजी राहुलशी होणार होतं. लग्न ठरल्यानंतरच्या तीन महिन्यांतच राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडले. ते तासनतास फोनवर बोलत असत. राहुल आजारी पडला तेव्हा अनिता २५ मार्च रोजी त्याच्या घरी गेली आणि पाच दिवस तिथे राहिली. अनिताच्या मुलीने सांगितलं की, जेव्हा तिने तिच्या आईला राहुलशी तासनतास बोलण्यापासून रोखलं तेव्हा तिची आई अनेक दिवस तिच्याशी बोलली नाही.

तपासासाठी एक पथक गुजरातला

सीओ महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचे काही नातेवाईक हे गुजरातमध्ये राहत आहेत. ज्या दिवशी राहुल त्या महिलेसोबत गेला, त्या दिवशी त्याने त्याच्या नातेवाईकला फोनवर सांगितलं होतं की, तो शेरवानी घेण्यासाठी गुजरातला येत आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तपासासाठी गुजरातला पाठवण्यात आलं आहे. सासरा  जितेंद्रने सांगितलं, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. 

"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई

जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी