शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:06 IST

खुशबूला सोडण्यासाठी तिचे वडील आणि काकाची मुले अहमदाबाद एअरपोर्टला आले होते. परंतु खुशबू ज्या विमानात बसली होती त्याचा अपघात झाला.

अहमदाबाद - राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुदावता गावातील खुशबू कंवर तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती परंतु नियतीच्या मनात दुसरेच काही होते. खुशबू राजपुरोहित लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. परंतु अहमदाबाद विमान दुर्घटनेत तिचा बळी गेला. खुशबू बोलातरा जिल्ह्यातील अराबा दुदावता गावातील मदनसिंह राजपुरोहित यांची मुलगी आहे. १८ जानेवारीला तिचं खाराबैरा पुरोहितान लूणी रहिवासी मनफूल सिंह राजपुरोहित यांच्याशी लग्न झाले होते. व्हिसा आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करून खुशबू पहिल्यांदा पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. 

बुधवारी गावातून निघाली होती

खुशबू तिचे सासर लूणीहून बुधवारी अहमदाबादसाठी निघाली होती जेणेकरून गुरुवारी तिला फ्लाईट पकडता येईल. परंतु कुणी विचारही केला नसेल हा तिचा अखेरचा प्रवास ठरेल. एअर इंडिया प्लाइटने ती लंडनला जात होती. मात्र हे विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांतच खाली कोसळले आणि भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच खुशबूचे गाव आणि सासरी शोककळा पसरली. या दुर्घटनेमुळे खुशबूच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला. 

खुशबूला सोडण्यासाठी तिचे वडील आणि काकाची मुले अहमदाबाद एअरपोर्टला आले होते. परंतु खुशबू ज्या विमानात बसली होती त्याचा अपघात झाला. सध्या खुशबूचे कुटुंब तिची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या अपघात कुणीही वाचण्याची शक्यता फारच कमी आहे असं अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यामुळे खुशबू राजपुरोहित हीदेखील दुर्घटनेत मृत पावल्याची शक्यता आहे.

राजस्थानमधील ११ प्रवासी

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राजस्थानातील ११ प्रवासी होते. त्यात बांसवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. विमानात उदयपूर येथील मार्बल व्यावसायिकाचा मुलगा-मुलगी प्रवास करत होते. ते लंडनला फिरायला चालले होते. सोबत एकाच गावातील २ युवकांचा समावेश आहे जे लंडनमध्ये शेफचे काम करत होते. विमानात बीकानेर इथला एक युवकही प्रवास करत होता. बांसवाडा येथील एका कुटुंबातील आई वडील आणि त्यांची ३ मुले प्रवास करत होते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातahmedabadअहमदाबाद