शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:08 IST

हरप्रीत बंगळुरुत खासगी कंपनीत काम करत होती. वर्क फ्रॉम होम असल्याने ती लंडनला जाण्याच्या तयारीत होती. 

इंदूर - अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २०० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. या अपघातात इंदूर येथील एका महिलेचाही जीव गेला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये इंदूरची हरप्रीत होरा या महिलेचाही समावेश होता. एअर इंडियाच्या प्रवासी यादीत तिचे नाव ६५ नंबरच्या सीटवर होते. हरप्रीत तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. मात्र या दुर्घटनेत तिचा जीव गेल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे हरप्रीतचे तिकिट आधी १९ जून रोजी होते परंतु १६ जूनला पतीचा बर्थडे असल्याने तिने ते तिकिट कॅन्सल करून १२ जूनचे तिकिट काढले होते.

इंदूरमध्ये होते हरप्रीतचे सासर

हरप्रीत इंदूरच्या राजमोहल्ला परिसरात राहणाऱ्या होरा कुटुंबातील सून होती. तिचे पती रॉबी होरा मागील ३ वर्षापासून लंडनला एका खासगी कंपनीत नोकरी करतात. हरप्रीत आणि रॉबी यांचे लग्न २०२० साली झाले होते. हरप्रीत बंगळुरुत खासगी कंपनीत काम करत होती. वर्क फ्रॉम होम असल्याने ती लंडनला जाण्याच्या तयारीत होती. 

१९ जूनला लंडनला जाणार होती

हरप्रीतच्या कुटुंबाने सांगितले की, तिने आधी लंडनला जाणारे तिकिट १९ जूनचे बुक केले होते. परंतु आमच्या मुलाचा म्हणजे तिच्या पतीचा वाढदिवस १६ जून रोजी होता. त्यामुळे १९ जूनचे तिकिट कॅन्सल करत तिने १२ जूनचे तिकीट काढले आणि दुर्दैवाने हाच तिचा अखेरचा प्रवास ठरला. या दुर्घटनेमुळे हरप्रीतच्या माहेरी आणि सासरी दोन्ही कुटुंबाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच ती माहेरी राहून आली होती आणि इथूनच लंडनसाठी जाणार होती. 

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच सगळ्यांचे डोळे पाणावले. काही तासांपूर्वीच हरप्रीतला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु कुणालाही साधी भनकही लागली नाही की काही मिनिटांनी सर्वकाही बदलणार आहे. हरप्रीतच्या अपघाताची बातमी मिळताच रॉबी लंडनहून इंदूरला येत आहे तर कुटुंबातील काही सदस्य अहमदाबाद येथे रवाना झालेत अशी माहिती रॉबी होराचे काका जसवीर होरा यांनी माध्यमांना दिली. 

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातahmedabadअहमदाबाद