एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:14 IST2026-02-02T20:13:44+5:302026-02-02T20:14:48+5:30
याची गांभीर्याने दखल घेत, नागरी विमानवाहतूक संचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व विमानांचे फ्यूल स्विचची तपासण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, खबरदारी म्हणून सर्व विमानांची तपासणी करण्यात आली असून इतर कोणत्याही विमानात बिघाड आढळून आला नाही, असे एअर इंडियाने स्पष्ट केले.

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान
एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ विमानात पुन्हा एकदा मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. लंडनहून बंगळुरूला येणाऱ्या विमानातील 'फ्यूल कंट्रोल स्विच'मध्ये बिघाड झाल्यचे सोमवारी निदर्शनास आले. ज्यामुळे उड्डाण रोखण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेत, नागरी विमानवाहतूक संचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व विमानांचे फ्यूल स्विचची तपासण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, खबरदारी म्हणून सर्व विमानांची तपासणी करण्यात आली असून इतर कोणत्याही विमानात बिघाड आढळून आला नाही, असे एअर इंडियाने स्पष्ट केले.
एअर इंडियानं जारी केलं निवेदन -
यासंदर्भात, एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या एका पायलटने बोइंग ७८७-८ विमानातील फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये संभाव्य बिघाड असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच आम्ही ते विमान तत्काळ ग्राउंड केले. उत्पादक कंपनीच्या (OEM) मदतीने त्याची सखोल तपासणी करण्यात येत आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोपरी आहे."
एअरलाइनने पुढे म्हटले आहे की, "या प्रकरणाची माहिती डीजीसीएला देण्यात आली आहे. डीजीसीएच्या निर्देशानंतर, एअर इंडियाने ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ विमानांवरील इंधन नियंत्रण स्विचची (फ्यूल स्विच) तपासणी केली. त्यांत कुठलाही समस्या आढळली नाही."
अहमदाबाद अपघाताची आठवण -
तत्पूर्वी, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर, काही महिन्यांनीच पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे. त्या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या चौकशीतही अशाच प्रकारचा तांत्रिक बिघाड समोर आला होता.
लंदनहून बंगळुरू येणाऱ्या फ्लाइटमद्ये नेमकं काय घडलं? -
सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, "विमान कर्मचाऱ्यांनी डाव्या इंजिनमधील इंधन नियंत्रण स्विचमच्या (फ्यूल कंट्रोल स्विच) तांत्रिक बिघाडासंदर्भात पायलटला माहिती दिली. एका वृत्तानुसार, एका क्रू मेंबरने माहिती दिली की, "इंजिन सुरू होताना, इंधन नियंत्रण वारंवार त्याची स्थिती बदलत होते. ते 'ऑन' पोझिशनवर लॉक न होता वारंवार 'कट ऑफ'कडे सरकत होते. अशा परिस्थितीत अनेकदा उड्डाणादरम्यान इंजिन बंद पडण्याचा आणि मोठी दुर्घटना घडण्याचा धोका असतो." ही बाब लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आले.