शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:08 IST

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad Plane Crash:गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. या अपघाताने जगाला धक्का बसला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ते एअर इंडियाचे AI 171विमान होते. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. 

या अपघातामुळे आता हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आता विमानामध्ये प्रवास करत असताना कोणती सीट सर्वात सुरक्षित आहे, या चर्चा सुरू आहेत. जगभरात अनेक विमान अपघात झाले, यामध्ये काहीजण सुरक्षित असल्याचे सापडले आहेत. चला जाणून घेऊ विमानात कोणती सीट सुरक्षित आहे.

मागील सीट सर्वात सुरक्षित

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण कोरिया आणि कझाकस्तानमध्ये विमान अपघात झाले होते. या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो पाहिले तर विमानाच्या मागील सीटवर बसलेले लोक वाचल्याचे समोर आले. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या अपघातानंतर संपूर्ण विमान जळून खाक झाले होते, पण विमानाच्या मागील भाग फक्त व्यवस्थित राहिला होता.

तसेच कझाकस्तानमधील झालेल्या अपघातामध्येही मागील बाजूल बसलेले लोक वाचले होते. विमानाचा मागील भाग तुलनेने कमी नुकसानग्रस्त होता.यामुळे विमानाच्या मागील बाजूची जागा अधिक सुरक्षित असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत

२०१३ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या अपघातामध्येही मागील सीटवर बसलेले लोक वाचले होते. तर १९८९ मध्ये सिओक्स सिटीमध्येही विमान अपघात झाला होता. या अपघातात विमानातील २६९ प्रवाशांपैकी १८४ जण बचावले. त्यापैकी बहुतेक जण इकॉनॉमी क्लासच्या पुढच्या भागात बसले होते. या अपघातामध्येही मागील बाजूस बसलेले लोक वाचले होते.

मागील सीट सुरक्षित का असते?

अनेक विमान अपघातांमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्यांना जास्त धोका झाला आहे. अपघातादरम्यान विमानाच्या मागचा भाग अनेकदा टक्कर पासून वाचतो. पण, आपल्याकडे विमानाच्या मागील सीटवर बसायला अनेकजण नकार देतात.  याचे कारण म्हणजे मागच्या बाजूला असलेले वॉशरूम, कमी लेगरूम आणि आपत्कालीन बाहेर पडण्याची जागा. विमानातील क्रू मेंबर्स देखील मागच्या भागात बसलेले असतात.

कोणती सीट असुरक्षित?

विमानातील मागील बाजूच्या सुरक्षित असल्या तर कोणत्या सीट असुरक्षित आहेत हा प्रश्न पडतो. विमानात मधल्या सीट सर्वात असुरक्षित मानल्या जातात. 

विमानातील मधल्या सीटच्या बाजूला विमानाचे पंखे असतात. या पंख्यांमध्ये विमानाचे इंधन भरलेले असते. विमान क्रॅश झाल्यास इंधन टाक्यांना आग लागण्याची सर्वात जास्त शक्यता असते. यामुळे मधल्या सर्वात असुरक्षित मानल्या जातात.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातAccidentअपघात