शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:42 IST

Ahmedabad Plane Crash: लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील विमानतळाजवळ कोसळले. या अपघातात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद येथून लंडनसाठी निघाले होते. या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी इंडिया टुडेशी फोनवरून बोलताना याची माहिती दिली.

विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

याशिवाय ५० जणांना उपचारासाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेघनगरच्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. विमानाचा काही भाग इंटर्न डॉक्टरांच्या वसतिगृहावर आदळल्याने काही वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पोलिस आयुक्त मलिक म्हणाले की, २०४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. २०४ मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी आणण्यात आले आहेत. हे सर्व लोक विमानात होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या वसतिगृहावर विमान कोसळले त्यामधील विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे, यामुळे विमानातील किती जण आणि बाहेरी किती जण आहेत याची माहिती मिळालेली नाही.

२४२ जण प्रवास करत होते

बोईंग 787 ड्रीमलायनर विमान (AI171) उड्डाणानंतर लगेचच कोसळले. विमानात २४२ जण होते, ज्यात दोन पायलटसह १० क्रू मेंबर्स होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी प्रास करत होते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरात