शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:08 IST

गुजरातमधील अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार तातडीने सक्रिय झाले आहे.

गुजरातमधीलअहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार तातडीने सक्रिय झाले आहे. या गंभीर घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पटेल यांनी मुख्य सचिव पंकज जोशी आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आदेश दिले, तसेच रुग्णालयांमध्ये उपचारांची सर्व व्यवस्था प्राधान्याने उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे ट्विट

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत म्हटले की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघाताने मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या विमान अपघाताच्या मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याशी संपर्क साधून एनडीआरएफ पथकांची आणि केंद्र सरकारची संपूर्ण मदत देण्याचे आश्वासन दिले आहे."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला फोन!

या संपूर्ण प्रक्रियेसोबतच केंद्र सरकारदेखील राज्य सरकारच्या मदतीस धावून आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधत या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, एनडीआरएफ पथकांना तत्काळ घटनास्थळी पाठवले जावे, असे म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार या प्रकरणी सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा अपघात स्थळी पोहोचल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अधिकृत तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात