शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:42 IST

Air India Plane Crash News: या विमान अपघातातील कोणाचीही वाचण्याची शक्यता वाटत नसल्याचे वक्तव्य हमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक केले आहे. परंतू, तरीही काहीजण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे.

अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान विमानतळ परिसरातच कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे विमान नजिकच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेलमधील इंटर्न डॉक्टरांचाही मोठ्या संख्येने यात मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच या विमान अपघातातील कोणाचीही वाचण्याची शक्यता वाटत नसल्याचे वक्तव्य हमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक केले आहे. परंतू, तरीही काहीजण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. 

या विमान अपघातातील मृतांची आकडेवारी समोर आलेली नाही, परंतू जखमींची यादी समोर आली आहे. या यादीनुसार २५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. या यादीतील बहुतांश जखमींचे वय हे १८ ते २२ वर्षे आहे. यामुळे हे सर्वजण बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचे इंटर्न असण्याची शक्यता आहे. 

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात 230 प्रवाशांसह 12 क्रु मेंबर्स प्रवास करत होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, अपघाताची तीव्रता पाहता कोणत्याही प्रवाशाची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. विमान निवासी भागात कोसळल्याने, काही स्थानिक लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे, त्यांचा जीव वाचणे कठीण आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादdoctorडॉक्टर