शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:46 IST

Anil Vij : हरयाणात विधानसभा निवडणुकीत अनिल विज यांनी अंबाला कँट मतदारसंघातून केवळ ७२७७ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

नुकत्याच हरयाणात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रशासनाने आपला पराभव करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याचे षडयंत्र रचले, असा दावा हरयाणात सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी केला आहे. एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनिल विज यांनी हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "प्रशासनाने अनिल विज यांना हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. प्रशासनाला माझा पराभव करायचा होता. प्रशासनाने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला, हा तपासाचा विषय आहे. मी थेट आरोप करत नाहीये... रक्तपात घडवण्याचा प्रयत्न झाला. अनिल विज यांचा जीव गेला म्हणजे निवडणूक बरबाद होईल."

दरम्यान, हरयाणात विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेले ७१ वर्षीय अनिल विज यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अंबाला कँट मतदारसंघातून अनिज वीज हे ७२७७ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने अंबाला कँट मतदारसंघातून कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय परविंदर सिंग परीला उमेदवारी दिली होती.

अनिल विज यांनी केला होता मुख्यमंत्रीपदावर दावा हरयाणात भाजपने निवडणूक जिंकण्यापूर्वीच अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि पक्षाला हवा तो मुख्यमंत्री होईल. पक्षाला माझी इच्छा असेल तर पुढची बैठक तुमच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होईल. मी पक्षात सर्वांपेक्षा वरिष्ठ आहे, असे ते म्हणाले होते.

बहुमताने भाजप सरकार स्थापनदरम्यान, हरयाणात गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने यावेळी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत.याशिवाय, दोन जागा इंडियन नॅशनल लोकदलाच्या खात्यात गेल्या आहेत.

टॅग्स :Anil Vijअनिल विजHaryanaहरयाणाBJPभाजपा